Lalu Yadav: लालूप्रसाद यादव जखमी, शिडीवरून पडून गंभीर दुखापत; रुग्णालयात दाखल
Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे.
Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील राबरी निवासस्थानी शिडीवरून खाली उतरत असताना त्यांचा तोल गेला. यामुळे ते पडले पडला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लालूंच्या खांद्यावर आणि कमरेलाही गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे सांगितले. उजव्या खांद्याला किरकोळ फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना डॉक्टरांनी घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचं समजतं आहे.
चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. सध्या ते माजी मुख्यमंत्री आणि पत्नी राबडी देवी यांच्या शासकीय निवासस्थानी आहेत. रविवारी लालू प्रसाद दुमजली निवासस्थानाच्या पायऱ्यांवरून खाली उतरत होते. यादरम्यान तोल गेल्याने त्याचा पाय घसरला, त्यामुळे ते पडले. घटनेनंतर लगेचच नातेवाइकांनी त्यांना पाटणा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात त्याच्या खांद्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाल्याचे बोलले जात आहे. उजव्या खांद्याला किरकोळ फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले आहे.
प्राथमिक उपचारानंतर लालू यादव यांना डॉक्टरांनी घरी पाठवले. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. लालूंच्या दुखापतीचे वृत्त कळताच समर्थकांची चिंता वाढली. राजदचे नेतेही त्यांची विचारपूच करण्यासाठी पाटण्यातील राबरी निवासस्थानी जमू लागले आहेत. मात्र, लालूंना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Politics NCP : शिवसेना बंडखोर आमदारांच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर प्रवेश; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जामीन
- BJP Executive Meet : पुढील 30 ते 40 वर्ष भारतात भाजपचं युग असेल - अमित शाह
- PM Narendra Modi : उद्धव ठाकरेंनी जाता जाता जे केलं तेच पीएम मोदीही करणार? भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत दिले मोठे संकेत!