एक्स्प्लोर

Lakshman Hake: '..आहे का हिंमत शरद पवाार, जरांगेमध्ये?' लक्ष्मण हाकेंची OBC आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका, म्हणाले

ओबीसी आंदोलनात फूट पाडू नका. आजपर्यंत भुजबळ साहेबांना टार्गेट केलं. आता धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका. ते तुम्हाला सोसणार नाही, असा इशारा हाकेंनी दिला. 

Jalna: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच तापला आहे. सोमवारी मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी संभाजीराजे छत्रपती गेल्याने दिवसभर अंतरवली सराटी आणि वडीगोद्री गावात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडल्या. दरम्यान, आज ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेवर महत्त्वाचं वक्तव्य केलंय. धनगरांना एसटी आरक्षण जाहीर करा मग आम्ही ओबीसीचा आरक्षण ठरवू असं म्हणत आहे का  शरद पवार आणि जरांगेमध्ये हिम्मत? असा सवाल हाकेंनी केला. उद्यापासून ओबीसी आरक्षणाची भूमिका ठरवू असंही हाके म्हणालेत. 

ओबीसी आंदोलनात फूट पाडू नका. आजपर्यंत भुजबळ साहेबांना टार्गेट केलं. आता धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका. ते तुम्हाला सोसणार नाही, असा इशारा हाकेंनी दिला. 

ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगा 

आम्हाला शासनाने आश्वासन द्यावं. 54 लाख नोंदी केल्यास म्हणता आणि ओबीसीला धक्का लागत नाही असेही म्हणता. ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगावं. आधी धनगरांना एसटी आरक्षण डिक्लेअर करा. मग आम्ही ओबीसीचा आरक्षण ठरवू. असं लक्ष्मण हाके म्हणाले. एसडीएम तहसीलदार सोडले तर शासनाचा एकही अधिकारी इकडे फिरकलेला नाही. तुम्ही राजधर्म विसरला तर तुम्हाला सळो की पळो करतील असं ओबीसी नेत्यांना ते म्हणाले.

आम्ही फक्त नाव घेतलं म्हणून एवढं झोंबतय का? 

विक्री भाषा म्हणजे काय. मिस्टर संभाजी भोसले एवढेच बोलले. आणि तुम्ही आम्ही ओबीसी आहोत. आम्ही फक्त नाव घेतलं म्हणून तुम्हाला झोंबतय, दलित ओबीसींच्या लोकांना काहीच इज्जत आणि स्वाभिमान नसतो का असा सवाल हाके यांनी संभाजीराजे छत्रपतींना केला.

राजरत्न आंबेडकर शरद पवारांचा एजंट आहे का?

मी राजरत्न आंबेडकर यांना ओळखत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. रामदास आठवले जोगेंद्र कवाडे यांना ओळखतो. आंबेडकर तुम्हाला आमदार खासदार व्हायचं असेल, इथल्या ओबीसींच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी नाव बदलावं, असं हाके म्हणाले. राजरत्न आंबेडकर शरद पवारांचा एजंट आहे का? असा सवाल करत काम करून आमदार होणार असेल ठीक. नको त्या गोष्टी फॉलो करून आमदार होता येत नाही. असंही त्यांनी सुनावलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Embed widget