... तर आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत? जशास तसे उत्तर देऊ; लक्ष्मण हाकेंकडून टोकाची भाषा
आम्ही होळकरांची अवलाद आहे अटकेपार झेंडा फडकवणारे ते होळकर आहेत. आम्ही, वाळवंटात युद्ध खेळले आहेत. असं लक्ष्मण हाके म्हणाले.
Jalna: राज्यात मराठा-ओबीसी वाद चांगलाच उफाळला असून जालन्यात मध्यरात्री झालेल्या गोंधळानंतर आता ओबीसी नेत्यांनी आता एल्गार पुकारलाय. त्यांचे सहा आंदोलन झाल्यावर आम्ही एक दोन आंदोलनं करु नये का? असा सवाल करत आमच्या मंडपासमोर रॅलीनं येऊन घोषणाबाजी होत असेल तर आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत. आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय.
गुरुवारी मध्यरात्री जालन्यात वडीगोद्री व आंतरवली सराटीच्या वेशीवर मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले होते. यावेळी मध्यरात्री घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते. यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा या भागात तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंना पुन्हा एकदा घेरल्याचं दिसून आलं.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले," आम्ही वर्षभर झुंडशाही बघतोय. कायदा सुव्यवस्थेचा मक्ता केवळ आम्हाला दिलाय. आणि याने वाटेल ते बोलावं, वाटेल त्या शिव्या द्याव्यात. आता ॲक्शन रिॲक्शन होणारच असा इशारा हाकेंनी दिलाय. यावेळी एकनाथ शिंदे, भुमरेला विचार धनगर ओबीसीच्या बाहेर आहे का? असा सवाल मनोज जरांगेंना केला.
मनोज जरांगे मनोरुग्ण
'जशास तसे उत्तर म्हणजे तू काय करणार? असा सवाल करत एका हातात ढाल आणि एक हातात तलवार नाही तर दोन्ही हातात तलवार घेऊन आम्ही लढलो त्यामुळे आमच्या नादाला लागू नको. असे प्रत्युत्तर लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना दिलं आहे. ते म्हणाले, जशास तसे उत्तर म्हणजे तू काय करणार आहेस आम्ही काय बांगड्या भरल्यात का? आम्ही होळकरांची अवलाद आहे अटकेपार झेंडा फडकवणारे ते होळकर आहेत. आम्ही, वाळवंटात युद्ध खेळले आहेत.
नवनाथ वाघमारेंचाही जरांगेंवर टीका
ओबीसी आरक्षण नेते नवनाथ वाघमारे यांनीही मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, जरांगेचे समर्थक इथे येऊन घोषणा देतात. आम्ही जर जरांगेच्या आंदोलन स्थळी जाऊन घोषणा देऊ शकतात. जरांगेचा आंदोलन मुख्यमंत्र्यांचा आंदोलन आहे, जरांगेला रात्री दोन दोन वाजता मंत्री काय बोलतात? जरांगे सारख्या पागल माणसाने आमच्यावर आरोप करण्याची भाषा थांबवावी. असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी..
मुख्यमंत्र्यांनी गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी मराठा समाज जवळ करण्यासाठी हे आंदोलन उभे केले आहे, याला रसद पुरून जरांगे सारख्या माणसाला तेढ निर्माण करण्यासाठी लावलेल आहे. असंही नवनाथ वाघमारे म्हणाले.
हेही वाचा: