एक्स्प्लोर

Jitendra Awhad: मोठी बातमी! "जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव सगळं व्यवस्थित होईल"; आव्हाडांनी सांगितलं अजित पवारांसोबचं शेवटचं संभाषण

Jitendra Awhad: विलीनीकरणाबाबत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या आणि अजित पवारांच्या शेवटच्या भेटीत नेमकं काय घडलं, नेमकं काय बोलले याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात घडामोडींना वेग आला, या घटनेनंतर अवघ्या दोन ते तीन दिवसातच दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाबाबत चर्चा आणि बैठका झाल्याचे दावे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये संभाव्य विलीनीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही बैठकाही झाल्याची माहिती आहे. या घडामोडींदरम्यान अजित पवार यांना भेटण्याआधी आदल्या दिवशी म्हणजेच २२ तारखेला शरद पवारांसोबत सिल्वर ओकवरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली असल्याची माहिती आहे. तर या भेटीबाबत आणि विलीनीकरणाबाबत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या आणि अजित पवारांच्या शेवटच्या भेटीत नेमकं काय घडलं, नेमकं काय बोलले याबाबत माहिती दिली आहे.

Jitendra Awhad: त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण झालं...

जितेंद्र आव्हाड म्हणाले, विलनीकरणाचा पुढाकार तर अजित पवारांनी घेतला होता. त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण झालं. हे मी आतापर्यंत बोललो नाही, तुम्हाला सांगतो या विषयावरती फार मला बोलायचं नाही. अजितदादा मला म्हणाले, जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव सगळं व्यवस्थित होईल, असंही त्यांनी आव्हाडांना म्हटल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Jitendra Awhad: माझा बाप जो निर्णय घेईल तो माझा निर्णय असेल

 मला या चर्चेतून लांब राहायचं आहे, त्यांना काय चर्चा करायची ते करू द्या. थर्ड ग्रेड कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये मला जायचं नाही. तो माणूस गेला आता त्यावर काय बोलू शकतो. तुम्ही स्पेसिफिकली विचारलं म्हणून मी तुम्हाला उत्तर दिलं. पण बाप जो निर्णय घेईल तो निर्णय आम्ही घेऊ, आपलं ठरलेलं आहे, बाप जो निर्णय घेईल ते करू. मी शांत बसलो आहे याची काही कारण आहेत. माझं ठरलं आहे, माझा बाप जो निर्णय घेईल तो माझा निर्णय असेल, असंही पुढे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Jitendra Awhad: २२ तारखेला शरद पवारांसोबत सिल्वर ओकवरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

अजित पवार यांना भेटण्याआधी आदल्या दिवशी म्हणजेच २२ तारखेला शरद पवारांसोबत सिल्व्हर ओकवरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत जयंत पाटील यांनी सर्व माहिती शरद पवारांना दिली. सिल्व्हर ओकवरुनच अजित पवारांना फोन करुन भेटण्यासाठी वेळ मागितली. त्यानुसार 23 तारखेला जयंत पाटील यांच्या घरी रात्री उशिरा भेटण्याचं सर्व नेत्यांनी ठरवलं. ९ वाजून ५५ मिनिटांनी जयंत पाटील यांच्या घरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 14 नेते पोहोचले. साधारणता १० वाजता अजित पवार काळ्या रंगाची पॅंट आणि निळ्या रंगाचा शर्ट घालून साध्या कपड्यात जयंत पाटील यांच्या निवासस्थानी पोहचले. अजित पवार यांच्याकडून ते एकटेच होते तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 14 नेते होते, अशी माहिती आहे. 

शरद पवारांकडून सुप्रिया सुळे, जयंत पाटील,  जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, अशोक पवार, राजेश टोपे यांचा सहभाग होता. कोणालाही संशय येऊ नये यासाठी सुरक्षा रक्षक बाजूला सोडून हे सर्व नेते वेगवेगळ्या गाड्यांमधून जयंत पाटलांच्या घरी पोहोचले. अजित पवार आणि या सर्व नेत्यांमध्ये साधारणत अडीच तास म्हणजेच रात्री साडेबारा वाजेपर्यंत बैठक सुरू होती. ज्या नेत्यांना विलनीकरणासाठी अडचण होती त्या नेत्यांनी जयंत पाटलांच्या घरी वन-टू-वन अजित पवारांसोबत बैठक केली. यामध्ये जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख आणि अशोक पवार यांनी वन टू वन अजित पवारयांच्या सोबत चर्चा केली. आपण जी चर्चा करतोय ही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना समजली तर? असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला. यावेळी पक्ष मी चालवतोय मी बघून घेईल असं उंच आवाजामध्ये अजित पवारांनी या  नेत्यांना सांगितलं. या बैठकीत फायनल चर्चा होऊन हे सर्व नेते निघाले अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case : शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच, ठाकरेंच्या वकिलांकडून दहाव्या अनुसूचीचा दाखला, राहुल नार्वेकरांनाही आरसा दाखवला
शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच, ठाकरेंच्या वकिलांकडून दहाव्या अनुसूचीचा दाखला, राहुल नार्वेकरांनाही आरसा दाखवला
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget