Jayant Patil on Vishal Patil : अपक्षांना निवडून देणे धोक्याचे, सूर्य पश्चिमेला उगवेल पण उद्धव ठाकरे निर्णय बदलणार नाहीत, जयंत पाटलांनी विशाल पाटलांच्या जखमेवर मीठ चोळलं
Jayant Patil on Vishal Patil : आम्ही अमरावतीमध्ये नवनीत राणांना पाठिंबा दिला, निवडून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी भाजपच्या दारात जाऊन बसल्या. त्यामुळे अपक्षांना निवडून देणे फार धोक्याचे आहे. कधी कुठे जातील, याचा पत्ता नाही.
Jayant Patil on Vishal Patil, Sangli : "आम्ही अमरावतीमध्ये नवनीत राणांना पाठिंबा दिला, निवडून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी भाजपच्या दारात जाऊन बसल्या. त्यामुळे अपक्षांना निवडून देणे फार धोक्याचे आहे. कधी कुठे जातील, याचा पत्ता नाही", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या प्रचारार्थ सांगलीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेस नेते विश्वजीत कदमही उपस्थित होते.
सूर्य एकदा पश्चिमेला उगवेल, पण ते निर्णय बदलणार नाहीत
जयंत पाटील म्हणाले, ज्याला शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मान्य आहे. त्यांनी जातीवादी शक्तीविरोधात लढताना चंद्रहार पाटलांसोबत उभे राहायला पाहिजे. सांगलीची जागा काँग्रेसने शिवसेनेला का दिली, असा सवाल मी विचारू शकतो. पण हा निर्णय झालाय, ताकदीने त्याच्यामागे उभे राहायचं. उद्धवजींचा एकदा निर्णय झाला की सूर्य एकदा पश्चिमेला उगवेल, पण ते निर्णय बदलणार नाहीत. संपूर्ण देशात सामान्य माणूस भाजपविरोधात आहेत. त्यांची भावना सामान्य लोक व्यक्त करत आहेत.
पवार साहेब पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रात फिरु लागले
महिन्याभरापूर्वी चित्र वेगळं होतं. पण जेव्हापासून महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे दौरे सुरु झाले. उद्धवजींच्या सभा सुरु झाल्या. पवार साहेब पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रात फिरु लागले. तसा महाराष्ट्र या दोघांच्या पाठिमागे उभा राहू लागला. तसं चित्रही निर्माण झालं. मराठी माणसाने तयार केलेले महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडण्याचं प्रायश्चित्त भारतीय जनता पक्षाला द्यायचं. हा निर्धार मराठी माणसाने महाराष्ट्रात केला आहे. मी आज आपल्यापुरतं सांगत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.
भाजपला पराभूत करण्यासाठी नवीन चेहऱ्यामागे उभं राहिलं पाहिजे
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही सर्व मित्र पक्ष हातात घालून काम करतोय. अपवाद फक्त सांगलीचा आहे. हा मतदारसंघ काँग्रेस आणि शिवसेनेच्या चर्चेमध्ये सेनेकडे गेला. शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. हा पक्षाचा निर्णय आहे, आघाडीचा निर्णय एकट्या शिवसेनेचा निर्णय नाही. एकदा पक्षाला जागा गेल्यानंतर निर्णय जाहीर झाल्यानंतर त्यावर चर्चा न करता भाजपला पराभूत करण्यासाठी नवीन चेहऱ्यामागे उभं राहिलं पाहिजे, असं आवाहनही पाटील यांनी केलं.
Jayant Patil Speech Sangli : स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा करू नका
इतर महत्वाच्या बातम्या
Jayant Patil on Vishwajeet Kadam : स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा चालणार नाही, जयंत पाटलांच्या विश्वजीत कदमांना कोपरखळ्या