मोठी बातमी : जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी, बंद दाराआड चर्चा; बाबाजानी दुर्रानी घड्याळ सोडून तुतारी हाती घेणार?
Jayant Patil meet Babajani Durrani : विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे.
Jayant Patil meet Babajani Durrani : विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय. अशातच त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांची त्यांच्या घरी जात भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय.
जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्रानी यांच्यात बंद दाराआड चर्चा
अजितदादांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पाथरी येथील निवासस्थानी घरी जयंत पाटील दाखल झाले आहेत. त्यामुळे बाबाजानी दुर्रानी यांच्या शरद पवार गटात सामील होण्याच्या चर्चांना उधान आलंय. बाबाजानी दुर्रानी अजित पवार गटाचे विद्यमान परभणी जिल्हा अध्यक्ष आहेत. ते विधानपरिषदेचे सदस्य देखील आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. बाबाजानी दुर्रानी यांनी जयंत पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली आहे.
अतुल बेनकेंनंतर अजितदादांचा आणखी एक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यामुळे आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर 'राजकारणात काहीही घडू शकते. अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काहीही घडू शकते, असं वक्तव्य अतुल बेनके यांनी केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या
Marathwada MLA List : गेल्या विधानसभेला मराठवाड्याने दिग्गजांना पराभवाचं पाणी पाजलं, आमदारांची यादी एका क्लिकवर