एक्स्प्लोर

Jayant Patil: समारोपाच्या भाषणात जयंत पाटील भावूक, आवंढा गिळून बोलायचे थांबले, शरद पवारांनी कार्यकर्त्यांना हात दाखवून शांत बसवलं

Jayant Patil: जयंत पाटील हे सात वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार झाले आहेत. आता शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील.

Jayant Patil NCP: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  गटाच्या मंगळवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात आली. तब्बल सात वर्षे राष्ट्रवादीच्या (NCP) प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयंत पाटील यांनी ही सूत्रं शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवली. यावेळी समारोपाच्या भाषणात जयंत पाटील (Jayant Patil) हे काहीसे भावनिक झाले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात आपण पक्षासाठी किती निष्ठेने आणि एकरुप होऊ काम केले, हे सांगितले. त्यांनी म्हटले की, 'त्यादिवशी मी माझ्या बायकोला सांगितलं की, सात वर्षे झाली, पण एकदा पण सुट्टी काढली नाही आपण. मी म्हटलं शेवटी उद्देश हा ...', या वाक्यानंतर जयंत पाटील हे प्रचंड भावूक झाले. त्यांना रडू आले पण त्यांनी आपल्या भावनांना आवर घालत आवंढा गिळला. त्यानंतर काही काळ जयंत पाटील हे काहीच बोलू शकले नाहीत. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणबाजी सुरु केली. तेव्हा व्यासपीठावर बसलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी हात उंचावून जयंत पाटील यांच्या समर्थकांना शांत राहण्याची सूचना केली. यानंतर जयंत पाटील यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्यांनी म्हटले की, 'दोन दोन खासदार असलेला भाजप जर इतका मोठा होऊ शकतो तर 10 आमदार आणि खासदार  असलेला आपला पक्ष का मोठा होऊ शकत नाही? हे सतत सर्वांनी कायम मनात ठेवा', असा सल्ला जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

माझी कोणतीही संघटना नाही, वेगळा गट नाही, असलं पाप कधी केलं नाही. २ हजार ६३३ दिवस मी प्रदेशाध्यक्ष आहे. आता पदावरुन बाजूला व्हायची ही योग्य वेळ आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

अजित पवारांसह अनेकांनी साथ सोडल्यानंतरही जयंत पाटील हे शरद पवारांशी कायम एकनिष्ठ राहिले होते. पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची मनधरणी करताना भावूक झालेले जयंत पाटील अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले होते. तरीही अलीकडच्या काळात पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी राहूनही जयंत पाटलांच्या भाजपप्रवेशाची चर्चा होत असते. मंत्रिमंडळाच्या टॉपच्या खात्यावरून जयंत पाटलांचा भाजप प्रवेश रखडल्याचे बोलले जात आहे. खुद्द जयंत पाटलांनी ही चर्चा फेटाळली असली तरी आता पदमुक्त झाल्यानं त्यांची वाटचाल काय असेल, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Sharad Pawar: शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली

अखेर शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवलीय. गेल्या अनेक वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर असलेल्या जयंत पाटलांची जागा आता शशिकांत शिंदेंनी घेतलीय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याचा एकप्रकारे विक्रमच केलाय...आता ते भाजपमध्ये जाणार की पवारांसोबतच राहणार, ही चर्चा सुरूच राहणार आहे. दुसरीकडे अतिशय कठीण काळात शशिकांत शिंदे यांच्यावर पदाची धुरा आलीय. आव्हानांवर मात करत शशिकांत शिंदे पक्षाला कशाप्रकारे नवी झळाळी देणार, हे आगामी काळात पाहावे लागेल.

आणखी वाचा

टॉप 5 मधील मंत्रिपदासाठी भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा, जयंत पाटील हसत हसत म्हणाले, पराचा कावळा कशाला करता!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report
Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget