एक्स्प्लोर

प्रवीण दरेकरांनी मराठा समाजाचा अपमान केलाय, आता गर्दी काय असते ते तुम्हाला मुंबईत दाखवू; मनोज जरांगे कडाडले

Manoj Jarange on Pravin Darekar: लाडकी बहीण योजनेवरून दरेकरांनी भंपकपणा सुरु असल्याच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी प्रविण दरेकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Manoj Jarange on Pravin Darekar: प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाचा अपमान केलाय, आता गर्दी काय असते ते तुम्हाला मुंबईत दाखवू असं म्हणत मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर सडकून टीका केलीये. जालन्यातील अंतरवली सराटी येथे आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस सुरु आहेत. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मराठा आरक्षण आंदोलक आणि भाजपकडून वार पलटवार होत आहेत. काल आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर खोचक टीका केली होती. आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात, सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगें बाहेर या. तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत, असा इशाराच जरांगेंना दिला आहे. यावर आज मनोज जरांगे चांगलेच संतापले असून पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याचं दिसतंय.

दरेकर वाटोळं करणारा माणूस

दरेकर माझ्या भोवती असणाऱ्या मराठ्यांना आमिष दाखवत फोडत आहे. माझ्या विरोधात बोलायला लावत आहे. दरेकर वाटोळं करणारा माणूस आहे. देवेंद्र फडणवीस बस म्हणल तिथं बस म्हणणारा माणूस आहे.त्याला मराठ्यांविषयी काही देणंघेणं नाही. काल ते लेकरू रडलं ते भंपकपणा वाटतं असं म्हणत मराठा समाजाचा अपमान केला आहे. जातीत गद्दार आहेत. जे नाही ते खोटं बोलायला आहे. असं म्हणत मनोज जरांगे यांनी आमदार प्रवीण दरेकरांवर हल्लाबोल केला.

"मी काय बोललो ते ऐकत जा दरेकर"

मुलीच्या डोळ्यातलं पाणी भंपकपणा म्हणाले का तुम्ही असं म्हणत एका आमदारकीचा माज दाखवू नको, इतकी सत्तेची, आमदारकीची मग्रूरी का? असा सवाल करत वेळ आली तर एकवेळ मराठे शिंदेंचे, पवारांचे, महाविकास आघाडीचे नेते निवडून आणतील आणि तुझेच पाडतील असे मनोज जरांगे म्हणाले.  तुमच्याच नेत्यांकडून तुमचाच सुपडासाफ होणार असल्याचं तुमच्याच बैठकीत ठरलंय. भंपकपणा म्हणजे, मुलींच्या डोळ्यातील पाण्याला भंपक म्हणत आहेत. दरेकरांनी मराठा समाजाचा अपमान केलाय. आता गर्दी काय असते आता आम्ही तुम्हाला मुंबईत दाखवू असा इशारा मनोज जरांगे यांनी प्रवीण दरेकरांना दिलाय.

हेही वाचा:

Video : 'लाडकी बहीण योजने'वरुन वार-पलटवार; भाजपच्या दरेकरांचा मनोज जरांगेंना इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Embed widget