मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना काढा, लक्ष्मण हाके कडाडले, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्यासाठी लेखी हमीची मागणी
शासनाने लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली तशी लाडका आंदोलक योजना जरांगेंसाठी जाहीर करावी. असे म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाकेंनी सरकारवर निशाणा साधलाय
Lakshman Hake: शासनाने लाडकी बहीण लाडक्या भावा सारखीच मनोज जरांगेसाठी लाडका आंदोलक नावाची योजना जाहीर करावी असे म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय, विरोधकांनी देखील ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी लेखी हमी द्यावी असे आव्हान देखील हाके यांनी दिलंय.
दरम्यान आज पासून ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेला सुरुवात झाली असून यावेळी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शासनाच्या संरक्षणात खिरापत वाटल्यासारखे कुणबी सर्टिफिकेट वाटले जात असल्याचा आरोप केला आहे.
लाडका आंदोलक योजना जरांगेंसाठी जाहीर करावी
शासनाने लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली तशी लाडका आंदोलक योजना जरांगे साठी जाहीर करावी. आपल्या शासनकर्ते मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही आमचा आरक्षण टिकवणार आहात की नाही? असा सवालही हाके यांनी केलाय.
जरांगेंवर नवनाथ वाघमारेंनी साधला निशाणा
दरम्यान ओबीसी आरक्षण आंदोलन लक्ष्मण हाके यांचे साथीदार नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर कडाडून टीका केलीय.जरांगे नावाच्या बांडगुळाने राज्यात हैदोस घालण्याचं काम केलं हॉटेल आणि ओबीसी नेत्यांच्या गाड्या जाळण्याचे काम केलं, असल्याची आरोप नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर केलाय.
जरांगेच्या अनेक आंदोलन सुरू झाली प्रशासन आणि सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम केलं असल्याचंही नवनाथ वाघमारे म्हणाले असून कोणाचेही गुन्हे मागे घेतले नाही पाहिजेत. सरकार जरंगेचे लाड करत असल्याचा ठपका ठेवत वाघमारे यांनी सरकारला घेरले.
शरद पवारांनी हा विषय सोडवायला हवा
जरांगेंच्या आंदोलनामागे कोणाचा हात आहे हे सर्व महाराष्ट्राला माहिती झाल असून जरांगेंच्या पाठीशी खुद्द मुख्यमंत्री असल्याचे सांगत आंदोलन नवनाथ वाघमारे यांनी सरकारवर निशाणा साधला.
मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरुप घेत असताना हा वाद शरद पवारांनी (Sharad Pawar) सोडवला पाहिजे. शरद पवारही जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत. यावर शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनीही बोलायला हवं असं म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधलाय.
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. जरांगे पॉलिटिक्स स्क्रिप्ट वरती काम करत आहेत असे म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय.दंगली घडवण्याची ओबीसींची बॅक हिस्ट्री नाही असं म्हणत महामानवांच्या पुतळ्याखाली बसून आम्ही कधी शिवीगाळ केली नाही. ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात तर आरोपाचे काय असा सवाल करत आमच्यात फूट पाडण्याचे काम जरांगे करत असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली. या प्रश्नावर शरद पवारांनी बाेलायला हवं असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधलाय.