(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपने तिकीट कापताच जय सिद्धेश्वर महाराज उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
Jay Siddheshwar Swami Meets Devendra Fadnavis : भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 उमेदवार यादी जाहीर केल्या.
Jay Siddheshwar Swami Meets Devendra Fadnavis : भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 उमेदवार यादी जाहीर केल्या आहेत. आत्तापर्यंत जवळपास 402 उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने सोमवारी (दि.25) विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांचा पत्ता कट करत माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, भाजपने तिकिट कापताच जय सिद्धेश्वर महाराज (Jay Siddheshwar Swami) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीला आले आहेत.
जय सिद्धेश्वर महाराज किती मतांनी विजयी झाले होते?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून भाजपने जय सिद्धेश्वर महाराजांना (Jay Siddheshwar Swami) उमेदवारी दिली होती. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या शिवाचार्य महाराजांनी 5 लाख 24 हजार मतं मिळवली होती. जय सिद्धेश्वर महाराज यांच्याविरोधात काँग्रेसने देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मैदानात उतरवले होते. सुशीलकुमार शिंदे यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3 लाख 66 हजार मतं मिळाली होती. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील सोलापुरात निवडणूक लढवली होती.
सोलापुरात प्रणिती शिंदे आणि राम सातपुते आमने-सामने
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. तर भाजपने शिंदेंविरोधात युवा आमदाराला तिकिट देऊन नवी खेळी केली आहे. प्रणिती शिंदे यांनी 3 वेळेस विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर राम सातपुते 2019 ची निवडणूक लढवता पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच. सोलापूरची लेक तुमचे स्वागत करत आहे, असं म्हणत डिवचलं आहे. तर राम सातपुते यांनी जय श्रीराम म्हणत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सागर बंगल्यावर खलबतं
महायुतीच्या जागा वाटपाच्या तिढा सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर बैठकांचा तडाखाच सुरु केला आहे. हर्षवर्धन पाटील, अजित पवार, सुनील तटकरे, महादेव जानकर, राम सातपुते शिवाय भाजपचे दिग्गज नेते सागर बंगल्यावर बैठकीसाठी अनेकदा उपस्थित राहिले आहेत. शिंदे गट आणि भाजपमध्ये अनेक जागांवर रस्साखेच सुरु आहे. नाशिकची जागा मिळावी, यासाठी भाजपकडे आग्रह करणार ,असं शिंदे यांनी म्हटले होते. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी ठाण्यात शक्तीप्रदर्शन केलंय. त्यामुळे अद्याप महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Kolhapur Loksabha : कोल्हापुरातील शिंदे गटातील दोन्ही खासदार अजूनही गॅसवर, उमेदवारीवर संजय मंडलिक अन् धैर्यशील माने काय म्हणाले?