एक्स्प्लोर

Raj Thackeray & Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सर्वात मोठा मान देण्याच्या तयारीत, दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर स्टेजवर बोलावणार?

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-मनसेच्या राजकीय युतीची घोषणा कधी करतील, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Raj Thackeray & Uddhav Thackeray: येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हेदेखील दिसू शकतात. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी 'एबीपी माझा'शी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले. दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते, असे सचिन अहिर यांनी म्हटले. सचिन अहिर हे शनिवारी 'एबीपी माझा'च्या न्यूजरुममधील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या राजकीय मिलनाविषयी महत्त्वाची टिप्पणी केली.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे, ही केवळ दोन पक्षांची गरज नसून ते राज्यासाठी गरजेचे आहे. ही लोकांच्या मनातील भावना आहे. आता गणपती संपल्यानंतर पितृपक्ष सुरु होत आहे. त्यामुळे आता दसऱ्याला चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. दसरा मेळाव्यात आमचे नेते सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याला सामोरे कसे जायचे, याविषयी मार्गदर्शन करतील. दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिशा द्यायची असते. त्यामुळे हा मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे, असे सचिन अहिर यांनी म्हटले. राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ हे एकमेकांना कायम बघत असतात. दसरा मेळाव्याला हे दोघे स्टेजवर एकत्र येतील, का माहिती नाही. पण आम्ही त्यांना आमंत्रित करु शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. आमच्याप्रमाणे त्यांचाही मेळावा असतो. त्यामुळे तेदेखील आम्हाला आमंत्रित करु शकतात, असे सचिन अहिर यांनी म्हटले. पक्षाचं आणि आघाडीचं व्यासपीठ वेगळं असतं. परंतु, यावेळचा शिवतीर्थवरील दसरा मेळावा हा 'न भूतो न भविष्यती', स्वरुपाचा असेल, असे संकेत सचिन अहिर यांनी दिले.

Shivsena & MNS: मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्वं टिकवण्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं गरजेचं: सचिन अहिर

गेल्या काही वर्षांपासून मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही मराठी माणसासाठी अस्तित्त्वाची लढाई असेल. मी 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत होतो. पण तेव्हा आम्हाला कधीही शिवसेनेसारखा पक्ष नसावा, असे वाटले नाही. राज्यात आपण नेतृत्व करतोय. पण महानगरपालिका शिवसेनाच चांगली चालवू शकते, हे आम्हाला वाटत होते. मुंबईचे स्वरुप आता बदलत चालले आगे. त्यामुळे मुंबईत आता मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन नेृतृत्त्व करणे, ही काळाजी गरज आहे, असे मत सचिन अहिर यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा

उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर आले, ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या बाळा नांदगांवकरांची भावनिक पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार
Prithviraj Chavan on Eknath Shinde : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Embed widget