एक्स्प्लोर

IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका

विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून जोरदार कौतुक केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

ठाणे : महाराष्ट्रासह देशातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांचे आयडॉल म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas nangare patil) यांची नुकतेच नागपुरात बदली करण्यात आली आहे. संघभूमी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राऊंड असलेल्या नागपूरच्या आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर, नुकतेच नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवत संघ परिवाराचे जोरदार कौतुक केले. त्यावरुन, त्यांच्यावर टीका होत असून मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही मनसेस्टाईलने त्यांच्यावर प्रहार केला. आता, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही एका वाक्यात खोचक टोला लगावला आहे.  

विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून जोरदार कौतुक केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या वक्तव्यावरुन आधी काँग्रेसने त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता राज ठाकरेंनी देखील जोरदार सुनावलं आहे. "तुम्हाला संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर पोलीस सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा," असा सल्लाच राज ठाकरेंनी नांगरे पाटलांना दिला. सध्या राजकीय मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी 'पुनर्वसन हमी योजना' सुरूच आहे, त्यामुळे तुमचीही सोय होईल, असेही त्यांनी म्हटले. तर, जितेंद्र आव्हाड यांनीही एकाच वाक्यात खोचक टोला लगावला. 

विश्वास नांगरे पाटील यांच्या संघ कार्यक्रमातील सहभागावरुन जितेंद्र अव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर, मला माहिती नव्हतं ते चड्डी घालतात, अशा शब्दात खोचक टोला आव्हाड यांनी लगावला. दरम्यान, विश्वास नांगरे पाटील हे आतापर्यंत राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. आता ते नागपूर शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळणार आहेत. नागपूरचे मावळते पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याजागी विश्वास नांगरे पाटील यांना जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या जागेवर, म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अपर पोलीस महासंचालक पदाची धुरा रवींद्र सिंघल यांच्याकडे देण्यात आली आहे. 

सरकारला पेपरफुटीचं गांभीर्य राहिलं नाही

टीईटी पेपरफुटीवरुनही आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. हे गंभीर नाही, महाराष्ट्राची परंपरा आहे, सर्वकाही फुटते, MPSC, MBBS NEET पेपर फुटते. फुटक्या सरकारला लोक जेव्हा गांभीर्याने घेत नाही, तेव्हा पेपरला कसे घेतील. याप्रकरणी आता दोषींना ताब्यात घेऊ या व्यतिरिक्त काही होणार नाही, सरकारला गंभीर घ्यायचे नव्हते, पेपर फुटले काय आणि डमी बसला काय? अशा शब्दात आव्हाड यांनी खंत व्यक्त केली. 

हेही वाचा

मोठी बातमी! TED पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Mumbai: मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Embed widget