एक्स्प्लोर

'मरेन, पण झुकणार नाही', ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut On ED :  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut On ED : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत 'झुकेंगे नही', असं ईडीच्या कारवाईवर म्हटलं आहे. 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने त्यांच्या दादर येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. यानंतर त्यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले आहेत की, 'तुम्ही त्या व्यक्तीला घाबरू शकत नाही, जो कधीही हार मानत नाही. झुकेंगे नही, असं ते म्हणाले आहेत.

संजय राऊत झुकणार नाही आणि पक्षही सोडणार नाही: राऊत 

राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''शिवसेनेला त्रास देण्यासाठी महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सर्व सुरु आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचा. मी लढणार, आम्ही लढू. महाराष्ट्र इतका कमजोर नाही आणि शिवसेनाही इतकी कमजोर नाही. खरी शिवसेना काय आहे, हे आज तुम्ही पाहत आहे.'' मरेन पण संजय राऊत झुकणार नाही आणि पक्षही सोडणार नाही, असं ही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटालाही लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे.''

'ईडी मला अटक करणार आहे आणि मी अटक होणार'

राऊत म्हणाले आहेत की, ''सर्वाना नाहीत आहे माझ्याविरोधात खोटं प्रकरण लावण्यात आलं आहे. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मी शिवसेना सोडणार नाही आणि महाराष्ट्राशी बेईमानी करणार नाही.'' ते म्हणाले, ''ईडी मला अटक करणार आहे. मी अटक करून घेणार आहे.''

दरम्यान, संजय राऊत यांना ईडीने आता फक्त ताब्यात घेतलं आहे. त्यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. ईडी कार्यालयात त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार असून काही तासात ईडी त्यांना अटक करणार का? हे स्पष्ट होणार आहे. 

संबंधित बातमी: 

संजय पांडे यांच्यानंतर घोटाळेबाज संजय राऊत आता ईडीच्या ताब्यात: किरीट सोमय्या
ED Detain Sanjay Raut : संजय राऊत ईडीच्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget