Hitendra Thakur : बाप का राज है क्या? औकात है, तो इज्जत से लढो; हितेंद्र ठाकूरांचा नेमका कोणाला इशारा?
Hitendra Thakur on Devendra Fadnavis, Vasai : पालघर लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. दरम्यान, पालघर लोकसभेचं वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
Hitendra Thakur on Devendra Fadnavis, Vasai : पालघर लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. दरम्यान, पालघर लोकसभेचं वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. नेत्यांच्या सभेत आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. पालघर लोकसभेचा प्रचार सुरु असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पालघरचे पालकमंञी रवींद्र चव्हाण अशा मविआ आणि महायुतीच्या सर्वच नेत्यांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, महाविकास आणि महायुतीच्या नेत्यांकडून टीका झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पञकार परिषद घेत तिघांचाही चांगलाच समाचार घेतला.
वसईत निपटवण्यासाठी आम्ही काय गाजर मुळी आहोत का?
वसई वालो को वसई में निपटायेंगे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या या टीकेला हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वसईवाल्यांना वसईत निपटवण्यासाठी आम्ही काय गाजर मुळी आहोत का? हा वसईकरांचा अपमान आहे. बाप का राज है क्या? औकात है, तो इज्जत से लढो, असा थेट इशारा हितेंद्र ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. यावेळी हितेंद्र ठाकूरांनी पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणांवरही निशाणा साधला आहे. पालकमंञ्यांनी फन हॉटेलमध्ये पालिका अधिका-यांची बैठक घेवून, ठेकेदारांकडून 20 कोटी जमा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप ठाकूरांनी केला आहे.
मी तुम्हाला पालघर जिल्ह्यातच निपटून टाकतो
हितेंद्र ठाकुरांनी उद्धव ठाकरेंनाही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकूर म्हणाले, मी मर्द आहे. हुकमशाही करत नाही. बाप मुख्यमंञी, मुलगा पर्यावरण मंञी असताना वाढवण बंदर करणार असं सांगितलं होतं. आता विरोध करत आहेत. हा यांचा दुटप्पीपणा आहे. भविष्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा हे भविष्यात एकञ येणार नाही हे कशावरुन? हे दोघे हनीमुलला एकञ जातील, असा दावाही ठाकूर यांनी केलाय. वसई विरार शहरात सध्या पाणी टंचाई केली जात आहे. वीज गायब केली जात आहे. त्यामुळे आम्हाला बदनाम केलं जातयं. शाह यांनी भर सभेत वसई विरारकरांसाठी 400 एमएलडी पाणी आणलं असं बोलतात, मग कुठे आहे पाणी? असा संतप्त सवालही यावेळी त्यांनी केला. विधानपरिषद आणि राज्यसभेत मत मांगण्यासाठी हेच लोक, याच ऑफीसवर माझ्याकडे लाचारासारखे आले होते, असं ही ठाकूरांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या