अजित पवारांना भर सभेत मराठा आंदोलकांचा पुन्हा विरोध, आरडाओरड, गोंधळ घालणाऱ्या 14 आंदोलकांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar: हिंगोलीतल्या वसमतमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी केली. अजित पवारांचं भाषण सुरू होताच मराठा आंदोलक आक्रमक झाले.
Hingoli: राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हिंगोलीतील वसमतच्या सभेत गोंधळ घातलेल्या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लातूर सभेवेळी गोंधळ झाला होता. उपमुख्यमंत्री स्टेजवर जाताच काही मराठा आरक्षण आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत घाषणाबाजी करत गोंधळ घातला होता. असाच प्रकार हिंगोलीच्या वसमतच्या सभेवेळीही घडला. यात गोंधळ घातलेल्या 14 मराठा आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय.
हिंगोलीतल्या वसमतमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी केली. अजित पवारांचं भाषण सुरू होताच मराठा आंदोलक आक्रमक झाले. वसमतमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात जन सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालय परिसरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भाषणाला आजित पवार उभे टाकताच मराठा आंदोलकांनी सभेत गोंधळ घातला आहे एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी स्टेज परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता.
वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालया समोर जन सन्मान यात्रेनिमित्त भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेदरम्यान मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी अचानकपणे गोंधळ घातला एक मराठा लाख मराठा आणि मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली होती. या आंदोलकांनी सभेदरम्यान आरडा ओरड करून गोंधळ निर्माण केल्याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये 14 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता वसमत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठा आंदोलक दाखल झाल्याने पोलिसांचा चांगलाच गोंधळ उडाला
मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक दाखल झाल्याने पोलिसांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. शेवटी पोलिसांनी मध्यस्ती करत आंदोलकांना सभा स्थळापासून बाजूला नेत हे आंदोलन शमविले आहे या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहोत परंतु पोलीस बळाचा वापर करून आम्हाला निवेदन देऊ दिलं जातं नाही आसा आरोप आंदोलकांनी केला आहे.