एक्स्प्लोर

Harshavardhan Patil : 5-5 सभांमधून आमच्यावर दमदाटी, फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांनी भूमिका मांडली, बारामतीत पाठिंबा कुणाला?

Harshavardhan Patil : महायुतीचा धर्म सगळ्याच पक्षांनी पाळला पाहिजे, त्यासाठी स्थानिक स्तरावर निर्माण झालेले प्रश्न सोडवणे आवश्य़क असल्याचं भाजप नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले. 

पुणे: महायुतीतील शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांच्या विरोधाची भूमिका घेतल्यानंतर आता इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनीही (Harshavardhan Patil) आपले पत्ते अद्याप गुलदस्त्यात ठेवल्याचं दिसतंय. महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळणं गरजेचं आहे, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जाहीर सभेत आपल्याला धमक्या मिळतात हे चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

सुरुवातीला सहज वाटणाऱ्या अजित पवारांना बारामती लोकसभेची निवडणूक काहीशी जड जाणार असल्याची चिन्हं आहेत. शिंदे गटाच्या विजय शिवतारेंच्या बंडानंतर आता भाजपमधील नेतेही त्यांच्याविरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यात हर्षवर्धन पाटील यांनी काही स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी मात्र विधानसभेला मदत केली तरच लोकसभेचं काम करू असा इशारा या आधीच दिला आहे. 

अजित पवार गटाकडून दमदाटीची भाषा चुकीची

देवेंद्र फडणवीसांशी चर्चा झाल्यानंतर बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, महायुतीमध्ये असलेल्या सर्वच पक्षांनी युतीधर्म पाळला पाहिजे. अजित पवार गटाचे नेते आपल्याला जाहीर भाषणात धमक्या देतात, दमदाटीची भाषा करतात आणि तेही लोकप्रतिनिधी मंचावर उपस्थित असताना. हे चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टींवर फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. 

स्थानिक प्रश्न सुटले पाहिजेत

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आजच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. बारामतीवर चर्चा झाली. त्यामध्ये आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांची भावना काय आहे ते सांगितलं. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी बसवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यामुळे त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करणार. जे काही स्थानिक स्तरावर निर्माण झालेले प्रश्न आहेत त्यावर चर्चा करून तोडगा काढणे आवश्यक आहे. पुढच्या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांसह चर्चा करण्यात येणार आहे. 

अजित पवारांशी थेट चर्चा करणार

स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्याशी चर्चा करणे आवश्यक असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं. त्यावर आपण यावर योग्य तो तोडगा काढू असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी दिला असल्याचं त्यानी म्हटलं. 

गृहमंत्री अमित शहा साहेबांशी पण या प्रश्नावरती आमची चर्चा झाली आहे. एक गोष्ट निश्चित आहे की देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी साहेबांना बसवणं ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे, त्याबद्दल आमच्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही. मात्र जे काही स्थानिक स्तरावरचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नामुळं जे काही विषय पुढे आलेले आहेत या विषयाच्या संदर्भात चर्चा झाली आणि आम्हाला फडणवीस साहेबांनी आणि केंद्रीय गृहमंत्री आश्वासित केलं. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणाDevendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीसCM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Embed widget