Goa Election: गोव्यात होळीनंतर होणार शपथविधी सोहळा, 'हे' दोन नेते ठरवणार नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव
Goa Election: होळीनंतर गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. राज्यातील 40 पैकी 20 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
Goa Election: होळीनंतर गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. राज्यातील 40 पैकी 20 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेंस कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे दोन केंद्रीय निरीक्षक, पक्षाचे सरचिटणीस बीएल संतोष आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल आज संध्याकाळी गोव्याला जाणार आहेत. नवीन सरकारची स्थापना आणि राज्याचा मुख्यमंत्री कोणाला करायचा याचा निर्णय हे दोन नेते घेतील. नवीन सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपालांनी मंगळवारी विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. मात्र उद्या 39 नेते आमदार म्हणून शपथ घेणार असले तरी, मुख्यमंत्री होळीनंतरच शपथ घेणार आहेत.
तीन अपक्ष आणि दोन महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आमदारांनी भाजपला पत्र लिहून बिनशर्त पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत भाजप सहज सरकार स्थापन करेल. याआधी सोमवारी गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन यांनी नवनिर्वाचित आमदार गणेश गावकर यांना विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी हंगामी अध्यक्ष (तात्पुरती सभापती) म्हणून शपथ दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते गावकर हे संवरडेमचे आमदार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी राजभवनात शपथ घेतली.
गोव्यात कोणाला किती मिळाल्या जागा?
40 सदस्यांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 21 आहे. पण राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. काँग्रेसला 11 जागा मिळाल्या असून मित्रपक्ष गोवा फॉरवर्ड पार्टीला (GFP) एक जागा मिळाली आहे. तर भारतीय जनता पक्षाला (BJP) 20 जागा मिळाल्या आहेत.
संबधित बातम्या:
- Goa Cm Candidate : मुख्यमंत्री पदासाठी बंड? गोव्यात आता भाजप विरुद्ध भाजप सामना रंगणार
- Sanjay Raut on BJP : गोवा जिंकलं म्हणून स्वागत झालं, ढोल वाजवले, पण... : संजय राऊत
- गोव्याचा पुढील मुख्यमंत्री कोण? वृत्तपत्रातील जाहिरातीतून सावंत यांना वगळलं
- Mamata Banerjee : गोव्यातील पराभवाचे दु:ख नाही, 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु : ममता बॅनर्जी