(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोव्यात मंत्रिमंडळ खातेवाटप; मुख्यमंत्री सावंत यांनी गृह आणि अर्थसह 'ही' पाच खाती ठेवली आपल्याकडे
Goa: गोव्यात मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गृह, वित्त, कार्मिक, दक्षता, राजभाषा यासह 5 खाती आपल्याकडे ठेवली आहेत.
Goa: गोव्यात मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गृह, वित्त, कार्मिक, दक्षता, राजभाषा यासह 5 खाती आपल्याकडे ठेवली आहेत. विश्वजित पी राणे यांच्याकडे आरोग्य आणि नगरविकास या पाच खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत. प्रमोद सावंत यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याशिवाय विश्वजित राणे, मौविन गोडिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खौंटे, गोविंद गौडे आणि अतानासिओ मोन्सेरा यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
कोणाकडे कोणतं खातं?
- विश्वजित पी राणे - आरोग्य, नगरविकास, टीसीपी, महिला व बालकल्याण, वन
- मौविन गोडिन्हो - वाहतूक, उद्योग, पंचायत आणि प्रोटोकॉल
- रवी नायक - कृषी, हस्तकला आणि नागरी पुरवठा
- नीलेश काब्राल- विधिमंडळ कामकाज, पर्यावरण, कायदा आणि न्यायव्यवस्था आणि पीडब्ल्यूडी
- सुभाष शिरोडकर- WRD, को-ऑपरेशन आणि प्रोवेडोरिया
- रोहन खुंटे- पर्यटन, आयटी आणि प्रिंटिंग आणि स्टेशनरी
- गोविंद गौडे- क्रीडा, कला आणि संस्कृती आणि RDA
- अतानासिओ मोन्सेरा - महसूल, कामगार, कचरा व्यवस्थापन
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत. भाजपला 40 सदस्यांच्या सभागृहात बहुमतापेक्षा एक जागा कमी मिळाली आहे. तीन अपक्ष आमदार आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) दोन आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Petrol Diesel Price : इंधन दरवाढ कायम, पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, 13 दिवसांत 8 रुपयांची दरवाढ, पाहा आजचे दर
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1096 रुग्ण, 81 जणांचा मृत्यू
- Adani : अदानींनी मुकेश अंबानी आणि झुकेरबर्गला मागे टाकलं, जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये सामील, जाणून घ्या किती आहे संपत्ती