एक्स्प्लोर

Ganesh Naik : देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला; गणेश नाईकांचं खळबळजनक वक्तव्य

Ganesh Naik On CM Devendra Fadnavis : राष्ट्रीय आगरी अध्यात्मिक संमेलनात बोलताना गणेश नाईकांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे मात्र स्पष्ट झालं नाही. 

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात जातपात मानली जात नाही अशी चर्चा राजकीय व्यासपीठावर नेत्यांकडून सातत्याने केली जाते. मात्र अनेकदा एखाद्या जातीच्या मेळाव्यात मात्र त्या नेत्यांना आवर्जून एखादी जात आठवते. राज्याचे मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनाही तशीच मुख्यमंत्र्यांची जात आठवली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला खळबळजनक असं वक्तव्य त्यांनी केलं. रायगड जिल्ह्यातील पेण येथे आयोजित राष्ट्रीय आगरी अध्यात्मिक संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

जात या मुद्द्याला हात घातलाना गणेश नाईकांनी हे वक्तव्य केलं. गणेश नाईक म्हणाले की, "कधीकधी जात ही माणसाला शाप ठरते तर कधी ती वरदान ठरते. देवेंद्र फडणवीस हे चुतुरस्त नेतृत्व आहे. त्यांनी सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तरी देखील ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला."

गणेश नाईकांचा रोख कुणाकडे? 

राष्ट्रीय आगरी अध्यात्मिक संमेलनात बोलताना गणेश नाईकांनी हे वक्तव्य केलं. असं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमकं कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. गणेश नाईकांचा रोख हा एखाद्या राजकीय नेत्याकडे, पक्षाकडे आहे की एखाद्या जातसमूहाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याकडे आहे हे मात्र स्पष्ट झालं नाही. 

अर्थकारणाशिवाय काही चालत नाही

आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही. तुम्‍ही स्‍वच्‍छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्‍हाला निवडून देतील याची गॅरंटी नाही असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं. तुमचं मन स्वच्छ असेल, तर मानसिक स्थिरता राहील, मग शारिरीक स्थिरता मिळते. त्‍यातून समाजकार्य होतं, मग अर्थकारण होतं आणि आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काहीच चालत नाही असं गणेश नाईक यावेळी म्‍हणाले. गणेश नाईकांच्या या वक्तव्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget