एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' पॅटर्न; उमेदवाराने अर्जासोबत दिली चक्क साडेबारा हजारांची चिल्लर

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये एका उमेदवाराने 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' या मराठी चित्रपटाची आठवण करून दिली आहे. उमेदवारी अर्ज भरताना चिल्लर नामनिर्देशन पत्रासोबत जमा केली आहे.

Yavatmal Washim Lok Sabha: लोकसभा निवडणुकांचे(Lok Sabha Elections 2024) पडघम केव्हाच वाजले असून लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha Election Second Phase) निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहे. असे असताना यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim) लोकसभा मतदारसंघामध्ये एका उमेदवाराने 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' (Gallit Gondhal Dillit Mujra) या चित्रपटाची आठवण करून दिली आहे. यात झाले असे की, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले उमेदवार मनोज गेडाम यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना चक्क 12 हजार 500 रुपयांची चिल्लर आपल्या नामनिर्देशन पत्रासोबत जमा केली आहे.

परिणामी, ही रक्कम मोजतांना संबंधित कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे बघायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात असलेली ही चिल्लर मोजतांना यात बराच वेळ गेल्याने अधिकाऱ्यांनी नामांकन अर्जाची पडताळणी केली आणि तो अर्ज ठेवून घेतला. मात्र मनोज गेडाम यांनी दुसऱ्या दिवशी हि रक्कम स्वतःच मोजून निवडणूक विभागाला द्यावी आणि आपला उमेदवारी अर्ज भरावा, असे  सांगण्यात आले आहे. मात्र या प्रसंगामुळे मराठी चित्रपटातील त्या खास किस्स्याची आठवण या निमित्याने झाली आहे.   

कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले उमेदवार मनोज गेडाम हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहे. गेडाम यांना लोक गुरुदेव या टोपण नावानेही ओळखतात. मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलो आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, आणि दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे. त्यामुळेच सामान्य जनता माझ्या पाठीशी असून मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वासही मनोज गेडाम यांनी बोलताना व्यक्त केलाय. जनतेच्या पैशातूनच मी ही निवडणूक लढवणार असून त्यांनी दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलो असल्याचेही ते म्हणाले. 

डिपॉझिट म्हणून सगळेच कॉइन नाही चालणार भाऊ!

 लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहे. असे असताना निवडणुकीचा अनुषंगाने  फॉर्म भरताना निवडणूक आयोगाकडून काही अटी शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच निवडणूक आयोगाकडून 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' पॅटर्नवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाचा अनुभव आता प्रत्येक निवडणुकीत अधिकाऱ्यांना पाहायला मिळतो आहे. चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटतो. तर एक एक रुपया मोजताना, वेळ जातो तो वेगळा. मात्र यंदा कुठल्याही उमेदवाराला केवळ एक हजार रुपयांचेच कॉईन देता येणार आहेत. त्यामुळे आता या नियमांचे कितपत पालन होतं हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण? VIDEO
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण?
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Embed widget