लक्ष्मण ढोबळे भाजपला देणार धक्का? लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची भेट घेतली.
Laxman Dhoble : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची भेट घेतली. नुकतीच ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन भाजपचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. भाजपमध्ये मागील 10 वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली होती. त्यामुळं लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातेय.
लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे मोहोळ विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून इच्छुक
दरम्यान, लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळ विधानसभेसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून लक्ष्मण ढोबळे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता पुन्हा लक्ष्मण ढोबळे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत एबीपी माझाने लक्ष्मण ढोबळे यांच्याशी संपर्क साधला. यावेली ते म्हणाले की, अद्याप मी राजीनामा दिलेला नाही. त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितलं की पक्षाचा राजीनामा द्या. त्यावर त्यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला असून विचार करुन निर्णय घेईन असं कळवल्याचे ढोबळे म्हणाले.
मोहोळ विधानसभा मतदारसंघात चुरस वाढली
मोहोळ विधानसभा मतदारसंघात चुरस वाढली असून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे पुत्र अभिजित ढोबळे यांनी विधानसभा निवडणूक लढवायची घोषणा केली आहे. सध्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने हे आहेत. ते राष्टरवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यांच्यामागे माजी आमदार जारन पाटील यांची मोठी साथ आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवार गटाकडून यशवंत माने यांनांचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उंमेश पाटील हे देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी देखील पदासाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी यशवंत माने यांच्या उमेदनवारीला विरोध केला आहे. तसेच दोन दिवसापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली आहे. त्यामुळं मोहोळ तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.