Ashok Chavan Resign: काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना भेटले, बोलले आणि हसलेही! दुसऱ्या दिवशी थेट राजीनामा; गेल्या 24 तासात काय घडले?
Ashok Chavan Resign: अशोक चव्हाण दुपारी तीन वाजेपर्यंत टिळक भवनामध्ये बसून होते. अशोक चव्हाण हे रविवार दिवसभर मुंबईला होते, अशी माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा आमदारकीसह काँग्रेस (Congress) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत चव्हाणांच्या भाजप पक्ष प्रवेशाची शक्यता आहे. कालपर्यंत काँग्रेसच्या प्रत्येक बैठकीत भाग घेणाऱ्या अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan Resign) राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून अधिकृत घोषणा केली आहे.
काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण दुपारी तीन वाजेपर्यंत टिळक भवनामध्ये बसून होते. अशोक चव्हाण हे रविवार दिवसभर मुंबईला होते. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या काही बैठका पार पडल्या. त्या बैठकीत ते सहभागी झाले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. बराच वेळ या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर ते प्रदेशाधयक्ष कार्यालयात बराच वेळ बसून होते.
अशोक चव्हाण काल दिवसभर तणावात
रविवारी अशोक चव्हाणांना काल प्रदेश कार्यालयात पाहिलेल्या काँग्रेस सदस्यांनी दिलेल्या मााहितीनुसार, अशोक चव्हाणांचा चेहरा तणावग्रस्त होता. कालच्या बैठकीनंतर तीन वाजता अशोक चव्हाण काल तीन वाजता पक्षकार्यालयातून बाहेर पडले. आज सकाळी अशोक चव्हाण जेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना भेटले त्याच वेळी काँग्रेस नेत्यांना या संदर्भात माहिती मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे अशोक चव्हाणांनी 12 ते 12.15 च्या सुमारास राजीनामा सोपावला आहेय राहुल नार्वेकरांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11. 24 वाजता विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपावला आहे. अशोक चव्हाणांनी त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपावला त्यानंतर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
गेल्या 24 तासांत अशोक चव्हाणांच्या हालचाली (काँग्रेस सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार)
- शनिवार-रविवार महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत प्रदेश कार्यालयात बैठका होत्या
- रविवारी दुपारी 12 वाजता चेन्निथला यांच्यासोबत बैठकीला अशोक चव्हाण पोहचले.
- त्यानंतर तासभर चेन्निथला यांच्यासोबत बैठक झाली आणि बैठकीतून बाहेर पड़ून दुपारी तीन पर्यंत अशोक चव्हाण टिळकभवनमध्ये बसून होते
- सकाळी 8 वाजता – राहुल नार्वेकरांची भेट घेतली
- सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी - आमदारकीचा राजीनामा दिला
- दुपारी 12.15 वाजता – राजीनाम्याची प्रत त्यांच्या मदतनीसाने प्रदेश कार्यालयात आणून दिली
- दुपारी 1.45 वाजता - अशोक चव्हाणांची ट्विटरवरून राजीनाम्याची घोषणा
काँग्रेस प्रभारी आणि अशोक चव्हाणांच्या भेटीत काय घडले?
अशोक चव्हाणांनी 24 तासात महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेतली. या भेटीमध्ये काही चर्चा झाली का? या भेटीमध्ये अशोक चव्हाणांचे समाधान झाले नाही त्यामुळे त्यानंतर अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अशोक चव्हाणांनी राजीनामा का दिला याची कारणे पुढे येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :