CM Channi Statement : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल, भाजप कार्यकर्त्यांनी केली अटक करण्याची मागणी
CM Channi Statement : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
CM Channi Statement : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका रोड शो दरम्यान लोकांना संबोधित करताना बिहार आणि उत्तर प्रदेशच्या जनतेच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मनीष कुमार सिंग यांनी हा गुन्हा नोंदवला आहे. चन्नी यांच्याविरोधात बिहारमधील पाटण्यातील कदमकुआन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चन्नींना अटक करा, भाजपची मागणी
मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून पोलिसांनी त्यांना अटक करावी, अशी मागणी मनीष कुमार यांनी केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस नेहमीच क्षेत्रवाद पसरवून देश तोडण्याचे काम करत आली आहे. देशातील कोणताही नागरिक देशात कुठेही नोकरी करण्यासाठी जाऊ शकतो, अशी तरतूद आपल्या देशाच्या कायद्यात आहे. मात्र ही गोष्ट खोटी ठरवण्याचे काम चन्नी यांनी केले आहे. आज पंजाब ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी बिहारी बांधवांचे योगदान खूप मोठे असल्याचे ते म्हणाले आहेत.
मनीष कुमार म्हणाले, "बिहारच्या जनतेने पंजाबला पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पण तिथल्या मुख्यमंत्र्यांनी बिहारी बांधवांना बदनाम करून त्यांचा अपमान करण्याचे काम केले आहे. भाजप युवा मोर्चा ही गोष्ट कदापि सहन करणार नाही." त्याचवेळी चन्नी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, बिहारमधील लोकांमध्ये इतकी प्रतिभा आहे की, ते कुठेही जाऊन काम करू करतात. आज बिहारचे लोक पंजाबच्या शेतीत किंवा कारखान्यात काम करतात. ते पंजाब सरकारला आर्थिकदृष्ट्या मजबूत करत आहेत. दरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 117 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'सोमय्या देशातील सर्वात मोठा चोर, भाजपला भुतानं झपाटलंय'
- महाआयटीत 25 हजार कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप, 25 हजार कोटींचा घोटाळा कसा? BJP चा सवाल
- Amol Kale : महाआयटी घोटाळा प्रकरण: संजय राऊतांनी आरोप केलेल्या अमोल काळेंनी म्हटलं, देश सोडून...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt][yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt[/yt]