एक्स्प्लोर

Farmer Protest Update: कृषी कायदे अंमलात आणताना मोदी सरकार कुठे चुकले? शरद पवार म्हणतात..

मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बारामती : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी दोन महिन्यांपासून अधिक काळ ठाण मांडून आहे. दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत चालले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कृषी कायद्याबाबत वाजपेयी पंतप्रधान असताना 2003 पासून चर्चेला सुरुवात झाली होती. 2004 ते 2014 या काळात मी कृषीमंत्री होतो. त्या काळात या कायद्याबाबत सविस्तर चर्चा झाली. शेती हा घटनेनं राज्याचा विषय. त्यामुळं मी देशातल्या सर्व कृषीमंत्र्यांची बैठक घेतली आणि राज्यासाठी हा कायदा करण्याबाबत सर्वांची मते घेवून एक समिती केली. त्याचा एक मसूदा या समितीमार्फत बनवण्याचा निर्णय झाला. त्याची जबाबदारी त्यावेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह नऊ राज्यातील कृषीमंत्री यांच्यावर होती. त्यातून मसूदा तयार करुन तो राज्यांना कळवून त्यावर विचार करण्याबाबत सुचवण्यात आले. त्यानंतर नवीन सरकार आलं. आता फरक असा आहे की नव्या सरकारने थेट कायदाच तयार केला आणि तो संसदेत आणून गोंधळात पास करुन तो अंमलात आणला, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

राज्यांना विश्वासात न घेता कायदा मंजूर : पवार वास्तविक कायदा करताना चर्चा होणे आवश्यक होतं. जो विषय राज्याशी संबंधित आहे, तिथं राज्यांना अधिक विश्वासात घ्यायला हवं होतं. पण मोदी सरकारने कोणतीही चर्चा न करता, राज्यांना विश्वासात न घेता कायदा एकदम आणला. राज्यांचा विषय असताना केंद्रानं कायदे केले. या सगळ्या गोष्टींबद्दल माझी तक्रार आहे. शेती आणि त्यातील सुधारणांना आपला विरोध नाही. जिथं शक्य असेल तिथं बदल केलाच पाहिजे. यात काही गोष्टींबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. पण, त्यावर चर्चेने तोडगा निघू शकेल. परंतु, ज्यावेळी देशातील 4 ते 5 राज्यातील लोक 70-72 दिवस ऊन, वारा, थंडी, पाऊस याची तमा न बाळगता रस्त्यावर येतात तेव्हा सरकारनं संवेदनशील असलं पाहिजे.

माझं मत असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी अशा ज्येष्ठ मंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. पियुष गोयल आमचे मित्र आहेत. ते मुंबईचेच आहेत. पण मला पियुष गोयल आणि शेती यातलं काही फारसं माहिती नाही. माझ्या ज्ञानात भर पडली की पियुष गोयल हे शेतीचे तज्ञ आहेत म्हणून. पण मला असं वाटतं की हा विषय गांभीर्याने लक्षात घेवून, शेतकऱ्यांची अस्वस्थता पाहून यावर ज्येष्ठ मंत्र्यांनी लक्ष घालणं आवश्यक होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget