एक्स्प्लोर

Shiv Sena vs Shinde SC Live : आई भवानी आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास, न्याय आपल्यालाच मिळणार : उद्धव ठाकरे

Shiv Sena vs Shinde SC Live : "सर्वोच्च न्यायालयात दुसरी केस सुरु आहे. माझा आई भवानी आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार," असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Maharashtra Political Crisis : "सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दुसरी केस सुरु आहे. माझा आई भवानी आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे," असा विश्वास शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केला. राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी हे उद्गार काढले. मुंबईतील मातोश्री या आपल्या निवासस्थानी शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याच विजयाचा विश्वास व्यत्त केला.

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कोणी किती अफजल खान आले तरी मला त्याची परवा नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. "आताचं वातावरण आहे भारावून टाकणारं आहे. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत. एक चांगली सुरुवात झाली आहे. मी तुळजाभवानीच्या दर्शनाला येणारच आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

'ज्यांना तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले'
मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचं आहे. कारण कैलास ने काय केलं हे सर्वांना माहिती आहे. ओमराजे देखील कसा रक्त पाळतोय हे तुम्ही देखील बघितलं आहे. तुमच्या आधी जालनाचे लोक आले होते. जालनाची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे. परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ज्यांना तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.

'...तर एक मेळावा इथेच झाला असता'
मी तर अजून घराच्या बाहेर पडलो नाही. ज्या क्षणी मी 'वर्षा' सोडून 'मातोश्री'त आलो तेव्हापासून असे शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. जर शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता. दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने एक मिळावा इथेच झाला असता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

भवानी मातेने शिवसैनिकरुपी तलवार दिली : उद्धव ठाकरे
"मला फोन येत आहेत. कुठेही काही आपलं वाकडं झालेलं नाही. भवानी मातेची कृपा आहे खरे कोण आणि चुकीचे कोण हे दाखवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली अशी आख्यायिका आहे. तसंच तुमच्याकडे बघून मला असं वाटतंय की भवानी मातेने मला ही तलवार दिली आहे," असं उद्धव ठाकरे शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले.

काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हामधून काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दीपक अशोकराव जवळगे यांच्यासोबत त्यांचे वडील अशोकराव जवळगे (उस्मानाबादमधून माजी जिल्हा उपाध्यक्ष झेडपी) यांच्यासोबत मोठा संख्येत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 200 ते 250 काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

Uddhav Thackeray On SC : कितीही अफजल खान आले तरी विजय आपलाच, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Unseasonal Rain : अवकाळीचं संकट कायम! मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, शेतकरी संकटात
अवकाळीचं संकट कायम! मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, शेतकरी संकटात
Bollywood Actress Tragic Death : सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रीचा झाला करुण अंत; नवऱ्यानेच संपवलं; थरकाप उडवणारी गोष्ट
सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रीचा झाला करुण अंत; नवऱ्यानेच संपवलं; थरकाप उडवणारी गोष्ट
Anant Ambani - Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी - राधिका मर्चेंट 'या' ठिकाणी शाही थाटात अडकणार विवाहबंधनात; जाणून घ्या लग्नसोहळ्याबद्दल प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
अनंत अंबानी - राधिका मर्चेंट 'या' ठिकाणी शाही थाटात अडकणार विवाहबंधनात; जाणून घ्या लग्नसोहळ्याबद्दल प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Buldhana Rain Update : सोसाट्याच्या वाऱ्यासह बुलढाण्यात जोरदार पाऊसABP Majha Headlines : 03 PM : 23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Interview : आवडीचे खाणे, राजकीय ताणेबाणे; नीलम गोऱ्हे यांच्यासोबत खास बातचीत ABP MajhaSanjay Shirsat :   महायुतीच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Unseasonal Rain : अवकाळीचं संकट कायम! मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, शेतकरी संकटात
अवकाळीचं संकट कायम! मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, शेतकरी संकटात
Bollywood Actress Tragic Death : सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रीचा झाला करुण अंत; नवऱ्यानेच संपवलं; थरकाप उडवणारी गोष्ट
सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रीचा झाला करुण अंत; नवऱ्यानेच संपवलं; थरकाप उडवणारी गोष्ट
Anant Ambani - Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी - राधिका मर्चेंट 'या' ठिकाणी शाही थाटात अडकणार विवाहबंधनात; जाणून घ्या लग्नसोहळ्याबद्दल प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
अनंत अंबानी - राधिका मर्चेंट 'या' ठिकाणी शाही थाटात अडकणार विवाहबंधनात; जाणून घ्या लग्नसोहळ्याबद्दल प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
बजरंग बलवान...  पंकजांविरुद्धचा उमेदवार संपत्तीतही तगडा ; कारखानदार सोनवणेंची संपत्ती किती?
बजरंग बलवान... पंकजांविरुद्धचा उमेदवार संपत्तीतही तगडा ; कारखानदार सोनवणेंची संपत्ती किती?
मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव; वैभव नाईकांची राणेंवर टीका
मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव; वैभव नाईकांची राणेंवर टीका
Raigad Lok Sabha : रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
छ. संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे भुमरेंना माघार घ्यायला लावून मला उमेदवारी देतील; विनोद पाटलांना कॉन्फिडन्स
छ. संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे भुमरेंना माघार घ्यायला लावून मला उमेदवारी देतील; विनोद पाटलांना कॉन्फिडन्स
Embed widget