Jahangirpuri Violence: देशात ज्या काही हिंसाचाराच्या घटना घडत आहे, याला भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, ''भाजपमुळे देशात सर्वत्र गुंडगिरी सुरू झाली आहे. आजकाल भाजपने देशभरात एक नवा राडा सुरू केला आहे. जिकडे पाहावे तिकडे भाजप शिक्षण, रोजगार, महागाई यावर न बोलता गुंडगिरी आणि भाषणबाजीवरच चर्चा करताना दिसत आहे. गेल्या आठ वर्षांपासून भाजपची सत्ता असल्याने देशात विकास झालेला नाही.''


मनीष सिसोदिया म्हणाले की, ही गुंडगिरी आणि भाषणबाजी थांबवायची असेल, तर भाजपच्या मुख्यालयावर बुलडोझर चालवणे हा त्याचा सोपा मार्ग आहे. भाजपच्या मुख्यालयावर आपोआपच बुलडोझर धावेल. भाजपने देशभरात सर्वाधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना का स्थापित केलं. बांगलादेशी आणि रोहिंग्या कुठे स्थायिक झाले आहेत, याचा हिशेब भाजपने आज द्यावा. हे लोक स्वतः स्क्रिप्ट लिहून दंगली घडवतात, असं ते म्हणाले आहेत.


गेल्या 15 वर्षांत भाजपने केलेली ही बेकायदेशीर बांधकामे एमसीडीने आधी का पाडली नाही, असे सिसोदिया म्हणाले. ते पुढे म्हणाले, ''कोणत्या भाजप नेत्याने पैसे खाऊन ही बेकायदेशीर बांधकामे करून दिली. याचे उत्तर भाजपने द्यावे, जे पंधरा वर्षे वस्तीचे काम करत होते, आज ते बुलडोझर लावून हटवण्याचे नाटक करत आहेत. ज्या भाजप नेत्यांच्या राजवटीत ही बेकायदा बांधकामे झाली आहेत, त्यांच्या घरावरही बुलडोझर चालवावा. यापूर्वी आपचे आमदार आतिशी म्हणाले होते की, देशभरात दंगली होत आहेत, ठिकठिकाणी गुंडगिरी होत आहे. या सर्व दंगली भाजप करत आहे.''


महत्त्वाच्या बातम्या: