Amravati Breaking : राज्यभरात भोंग्याचा वाद तापलेला पाहायला मिळत आहे. अमरावतीत शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला आहे. शिवसैनिकांकडून राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. शिवसैनिकांकडून राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. शिवसैनिकांनी राजापेठ परिसरापासून गंगा सावित्री निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, शंकर नगर भागात पोलिसांनी शिवसैनिकांचा मोर्चा अडवला आहे.
यासंदर्बात प्रतिक्रिया देत खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे की, 'देवाचं नाव स्मरण करण्यासाठी आठवण करुन दिल्यामुळे जर आमचा शिवसैनिकांकडून निषेध होणार असेल तर, आमची काही हरकत नाही. देवाच्या नावासाठी आमचा निषेध कबुल आहे. आमच्या धर्मासाठी आम्ही काही करु शकतो. देवाचं नाव घेण्यासाठी आमच्या घरावर मोर्चा काढणाऱ्यांचं आम्ही स्वाग करतो.' 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हनुमान चालीसाचं पठण केव्हा करणार', असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलं आहे. हनुमान चालीसा पठण न केल्यास मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे शिवसैनिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिवसैनिकांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
याला प्रत्युत्तर देत नवनीत राणा म्हणाल्या, 'मी मुंबई, महाराष्ट्राची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी मला वेळ आणि जागा सांगावी. तेव्हा तेथे येऊन मी हनुमान चालीसा पठण करेन.' अमरावतीच्या खंडेलवाल नगरमधील पगडीवाले हनुमान मंदिर याठिकाणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या तर्फे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने हनुमान चालीसा पठण करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- गुणरत्न सदार्वते यांच्या निवासस्थानी सहा महिन्यांपासून बैठकांचा तगादा, सूत्राची माहिती
- Kirit Somaiya : शौचालय घोटाळ्याचा आरोप; कारवाईआधीच सोमय्यांकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न
- Delhi Violence : दिल्लीतील दगडफेकीनंतर राजकारण; केजरीवालांचं सुरक्षेवरून केंद्राकडे बोट, भाजपचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
- Jammu Kashmir Encounter : अनंतनागमध्ये जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कराचा जवान शहीद, ऑपरेशन सुरूच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha