Eknath Shinde Thane Varsha Marathon: इशारा मिळताच एकनाथ शिंदे सुस्साट धावत सुटले, मॅरेथॉनचा व्हिडीओ व्हायरल
Eknath Shinde Thane Varsha Marathon : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉनमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावताना दिसून आले.

Eknath Shinde Thane Varsha Marathon : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉनला (Varsha Marathon) आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते जल्लोषात सुरुवात झाली. ही मॅरेथॉन यंदा ३1 व्या वर्षात पदार्पण करत असून, ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मॅरेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि ठाणे महापालिकेचे आयुक्तही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 21 किमीच्या मुख्य मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ देण्यात आला. या मॅरेथॉनमध्ये अनेक धावपटूंनी भाग घेतला असून, उत्साह आणि उर्जेने ठाण्याचे रस्ते गजबजून गेले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या धावण्याचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
खेळाडूंसाठी आणि स्टेडियमसाठी पैसे कमी पडणार नाहीत
या मॅरेथॉनआधी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि भावांनो... वर्षा मॅरेथॉनचे घोषवाक्य आहे की, मॅरेथॉन ठाण्याची उर्जा तरुणाची... मी एक होर्डिंग पाहिले की,"तू धाव... तू धाव... घे क्षितिजाचा ठाव... आपण शहर, राज्य आणि देशासाठी धावायचे असते. ठाण्याचा विकास झाला. ठाणे बदलत आहे. ठाणे विकसित होत आहे. ठाणे शहरात अर्बन फॉरेस्ट आपण केले आहे. सेंद्रिय शेती महापालिकेने सुरुवात केली आहे. ठाण्याची शान स्टेडियम देखील चांगले केले. नूतनीकरणाला पैसे मिळाले की नाही? 23 कोटी मिळाले मग 8 कोटी मिळाले अजून पाहिजे? खेळाडूंसाठी आणि स्टेडियमसाठी पैसे कमी पडणार नाहीत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आरोग्यासाठी धावा, शहर, राज्य आणि देशासाठी धावा
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, सप्टेंबरमध्ये मेट्रोचे ट्रायल रन होईल आणि या वर्षाखेरीस सुरू होईल. ठाणे महापालिकेच्या इंटर्नल मेट्रोला आपण मान्यता मिळवली आहे. ठाण्याचा ग्रीन कवर आपल्याला वाढवायचे आहे, असे न्यायमूर्ती म्हणाले. आपण दरवर्षी एक लाख झाझे लावतो. यंदा सव्वालाख झाडे लावली आणि 2 लाख टारगेट आहे. या मॅरेथॉनच्या निमित्ताने माजी खासदार सतीश प्रधान साहेबांची आठवण येत आहे. ही मॅरेथॉन वाढत गेली. कोविडमध्ये थोडा गॅप होता. आम्ही ठाण्यात खेळाडूंना खूप प्राधान्य देत आहोत. आमची सर्वांची इच्छा आहे की, ठाण्याचे नाव ऑलिंपिकमध्ये गेले पाहिजे. पीएम मोदी यांनी खेलो इंडियाद्वारे खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. राज्य सरकार देखील तेवढेच प्रोत्साहन देत आहे. आरोग्यासाठी धावा, शहर, राज्य आणि देशासाठी धावा, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा























