एक्स्प्लोर

एकनाथ शिंदेंनी दीपक केसरकरांना दिली समज; मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले महत्वाचे निर्देश

CM Eknath Shinde On Deepak Kesarkar: मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या कारभारावरुन मंत्रिमंडळाने तीव्र नाराजी देखील व्यक्त केल्याचे समजते. 

CM Eknath Shinde On Deepak Kesarkar मुंबई: शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात सरकारची प्रतिमा मलिन होत असून केवळ कारवाईच्या घोषणा नको, तर कृती करा, शाळांमध्ये मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना समज दिल्याची माहिती समोर येत आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) माध्यमातून महायुती सरकारची राज्यभर चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना बदलापुरमधील एका शाळेत (Badlapur Crime) अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण राज्यात सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहचला आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या कारभारावरुन मंत्रिमंडळाने तीव्र नाराजी देखील व्यक्त केल्याचे समजते. 

बदलापूरच्या शाळेतील 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब-

बदलापूर प्रकरणात शाळेतील सीसीटिव्हीचे मागील 15 दिवसांचे रेकॉर्डिंग गायब झाले आहे. सीसीटीव्ही गायब झाल्याची बाब  शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून  आल्याची माहिती देखील  मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच शाळेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती असतानाही कारवाई केली नाही, असे देखील दिपक केसरकर म्हणाले. शाळांमध्ये मदतकक्ष सुरू करत आहे.  शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून ही बाब समोर  आली आहे. 15 दिवसांचे सीसीटीव्ही आढळलेले नाही, असे अहवालात म्हटले आहे. मुलीच्या कुटुंबियांची भेट आम्ही लवकरच घेणार  असून या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. 

आरोपी अक्षय शिंदे याच्या दोन पत्नींची चौकशी-

बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या दोन सदस्यीय समितीने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. तर पोलिसांच्या एसआयटी पथकाकडून आरोपी अक्षय शिंदे याच्या दोन पत्नींची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्या तिसऱ्या पत्नीचीही लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

सर्व महिला शिक्षिकांची पोलिसांमार्फत चौकशी-

बदलापूर घटनेतील पॉस्को दाखल  गुन्ह्यात पॉस्को मधील २१  कलम वाढवण्यात आले आहे. शाळेत घडलेली घटना ज्या शिक्षकांनी लपवली त्यांनी पोलिसांना कळवली नाही अशा सगळ्या दोषी शिक्षक आणि शाळा प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांना यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. यात नेमके कोण शिक्षक आहेत शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी कोण आहेत याची चौकशी सुरु आहे. बदलापूर शाळेत घडलेल्या प्रकरणानंतर प्राथमिक वर्गातील सर्व महिला शिक्षिकांची पोलिसांमार्फत चौकशी सुरू असल्याचे समजते.

संबंधित बातमी:

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र,नवीन भव्य पुतळ्यासाठी एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget