एक्स्प्लोर

Mumbai crime: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या डॉक्टर पत्नीने टोकाचं पाऊल उचललं, मुंबईत जीवन संपवलं

Mumbai crime: मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, वरळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमीक माहिती आहे.

मुंबई: भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे (anant garje) यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा ७ फेब्रुवारीलाच विवाह झाला होता. वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. काल सायंकाळी सात वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसानी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. वरळी बीडीडी येथे गौरी रहात होत्या, त्या केईएम रुग्णालय डेटिस विभागात कार्यरत होत्या. (pankaja munde PA anant garje wife dr Gauri Palave End her life at mumbai home)

मिळालेल्या माहितीनुसार, काल (शनिवारी, ता 22) रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. काही महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. मृतदेह रुग्णालयात असून त्यावर पोस्टपार्टम केले जाणार आहे. पोस्टमार्टममधून सत्य बाहेर येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अनंत गर्जे यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाल्याची माहिती आहे. या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे या देखील उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यांत अनंत गर्जेंच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

अनंत गर्जे (anant garje) आणि डॉक्टर गौरी पालवे यांच्या लग्नाला देखील पंकजा मुंडे आपली बहीण प्रीतम मुंडेंसह गेल्या होत्या, मोठ्या थाटामाटात ७ फेब्रुवारीला लग्न झालं होतं. अवघ्या दहा महिन्यांचा संसारात नेमकं काय घडलं, त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे, तर अनंत गर्जे यांचे अफेअर असल्याने गौरी गर्जे या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गौरी गर्जे यांचा सासरच्या मंडळींकडून छळ होत होता, असा आरोप देखील त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. वरळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला, शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे, कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे, अपमृत्यूची नोंद  करून पुढील तपास सुरु आहे.

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget