एक्स्प्लोर

थकित वीजबिल असणाऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा संघर्ष अटळ, उदयनराजेंचा इशारा

वीज कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देवून, तोडण्याऐवजी जोडण्याचे काम चांगले केलेले असताना, असा प्रकार होत असेल तर ते निश्चितच वेदनादायी आहे, असं उदयनराजेंनी म्हटलं.

सातारा : थकित वीज बिल असणाऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा  संघर्ष अटळ आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी असा इशारा दिला आहे. उदयनराजेंनी याबाबत एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहे. कोरोना महामारीत सामान्य जनतेचे हाल झाले आहेत. वीज कापली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. वीज बिल थकबाकीदारांच्या मी पाठीशी ठामपणे उभे राहणार आसल्याचेही पत्रकात उदयनराजेंनी म्हटलं आहे.

सध्या कोरोना महामारीने गेले वर्षभर ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व नागरीक त्रस्त आहे. लॉकडाउन,अनलॉक प्रकाराचा सकारात्मक/नकारात्मक परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडला आहे. बहुतांशी सर्वच क्षेत्रातील व्यावसायिक आणि मुख्यत्वेकरुन शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत, विद्यमान आधुनिक काळात वीज जोडणी अत्यावश्यक आहे. अशी वीज जोडणी, वीजबिल थकबाकीमुळे तोडण्याची कारवाई वीज वितरण कंपनीकडून केली जात आहे. वीज कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देवून, तोडण्याऐवजी जोडण्याचे काम चांगले केलेले असताना, असा प्रकार होत असेल तर ते निश्चितच वेदनादायी आहे. त्यामुळे थकबाकीबाबत टप्याटप्याने रक्कम भरण्याचा निर्णय घेऊन कंपनीने महामारीने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा संघर्ष अटळ आहे असा गर्भित इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

दिल्ली सारख्या राज्यामध्ये वीजबिल काही युनिटपर्यंत पुर्णतः माफ आहे. तेथे ठराविक युनिटपर्यंत वीज मोफत पुरवली जाते. त्या राज्याचे प्रतियुनिट दर देखील खुप कमी आहेत. देशात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही निश्चितच अग्रेसर राहिली आहे. कोरोना काळात देखील वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अखंड वीज पुरवठा करण्याचे वाखाणण्यासारखे काम केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा देखील सुरळीत राहिला. महाराष्ट्राची वीजेच्या गरजेपैकी जवळजवळ निम्मी वीज सातारा जिल्ह्यात तयार होत आहे ही वस्तुस्थिती
आहे. कोरोना महामारीने गेले संपूर्ण वर्षभर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कौटुंबिक गरजा भागवताना जवळजवळ सर्वांचीच तारेवरची कसरत होत आहे. आज काल वीज पुरवठा अत्यावश्यक झाला आहे. कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य ऑनलाईन चालू आहे. जर वीज पुरवठा नसेल तर त्या घरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे. 

सध्या शहरी भागासह, ग्रामीण भागातील सर्व कुटुंबातील बहुतांशी कामे ही वीज पुरवठ्यावर सुरु आहेत. कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात वीज कंपनीने, वीज बिलांचे सुद्ध वाटप केलेले नव्हते. सदरची तीन-चार महिन्यांची वीज बिले एकत्रितपणे कालांतराने दिल्याने ती भरताना, कौटुंबिक आर्थिक नियोजन बारगळलेले आहे. तसेच एकत्रित वीज बिल दिल्याने एकूण युनिट्सचा युनिट दर लागला गेल्याने, त्या युनिटसंख्येनुसार वीज दर आकारुन बीले दिली गेल्याची उदाहरणे आहेत. यामध्ये वीज ग्राहकाचे दुहेरी नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, थकीत वीज बिल टप्याटप्याने भरणेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा. किंवा याबाबत धोरणात्मक निर्णय मंडळाने घेतला पाहीजे. कोरोना सारख्या संसर्गजन्य जागतिक महामारीत जर वीज थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार असेल तर ते कदापी मान्य करता येणार नाही. अशावेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजुने ठाम उभे राहणार आहोत. तसेच अशा कारवाईत कोणाकोणाची वीज तोडली याचा आढावा घेवून, त्याबाबतचा जागेवरच सोक्ष मोक्ष त्या त्या वेळी लावताना संघर्ष अटळ ठरेल गर्भित इशारा देखील उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

Embed widget