एक्स्प्लोर

Dhairyasheel Mohite Patil : इथून पुढं माण तालुक्यात नुरा-कुस्ती चालणार नाही, वस्तादांचे वस्ताद शरद पवार योग्य उमेदवार देतील : धैर्यशील मोहिते पाटील

Dhairyasheel Mohite Patil, Satara : "देशात राजकारणातले वस्ताद कोण आहेत? तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वस्तादांचे वस्ताद शरद पवार (Sharad Pawar) आहेत. माण तालुक्याच्या जनतेने ठरवलं आहे की, इथून पुढं माण तालुक्यात नुरा कुस्ती चालणार नाही."

Dhairyasheel Mohite Patil, Satara : "देशात राजकारणातले वस्ताद कोण आहेत? तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वस्तादांचे वस्ताद शरद पवार (Sharad Pawar) आहेत. माण तालुक्याच्या जनतेने ठरवलं आहे की, इथून पुढं माण तालुक्यात नुरा कुस्ती चालणार नाही. कसलीच नुरा कुस्ती चालणार नाही आणि मॅच फिक्सिंगही चालणार नाही. वस्ताद आपल्याला योग्य उमेदवार देणार आहेत. निश्चित राहा. आपल्या सर्वांच्या मनातला उमेदवार वस्ताद देतील", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) म्हणाले. ते माणमध्ये बोलत होते. 

रमोडी प्रकल्पातून माण नदीला पाणी सोडून बंधारे भरून घ्यावे

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, जि-हे कटापूर अथवा उरमोडी प्रकल्पातून माण नदीला पाणी सोडून बंधारे भरून घ्यावे व येराळवाडी तलावात पाणी सोडावे म्हणून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब मागणी केली. म्हसवड  नगर परिषदेला सध्या 8 दिवसातून एकदा पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला जात आहे व सध्या वाडीवस्तीसाठी टँकरनी पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी मोठी वणवण चालू आहे, असंही मोहितेंनी स्पष्ट केलं. 

पुढे बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, म्हसवड येथील माण नदीमध्ये उरमोडी प्रकल्पाचे अथवा जिहे कटापुर प्रकल्पाचे पाणी सोडून बंधारे भरलेस येथील पाणी पातळी वाढलेस विहरी व बोअर चालू होउन पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल.तरी म्हसवड येथील माण नदीमध्ये उरमोडी प्रकल्प अथवा जि-हेकटापुर मधून बंधारे भरावे. याच बरोबर खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता ही 32.80 दलघमी असून या प्रकल्पामध्ये सध्या 33 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पावर 45 गावांच्या पाणी पुरवठा योजना, औद्योगीक वसाहतीसाठी लागणारे पाणी तसेच लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी लागणारे पाणी प्रकल्प आराखड्यामध्ये सामाविष्ठ आहे.

शेती सिंचनासाठी पाण्याची नितांत गरज भासणार 

सध्या लाभक्षेत्रामध्ये पाऊसमान कमी असलेमुळे व धरणातील उपलब्ध पाणी साठा लक्षात घेता भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजना, औद्योगीकरणासाठी लागणारे पाणी तसेच शेती सिंचनासाठी पाण्याची नितांत गरज भासणार आहे. यासाठी या प्रकल्पामध्ये जिहे कटापूर योजना किंवा उरमोडी प्रकल्पामधून पाणी सोडून येरळवाडी तलाव भरणे अत्यंत गरजेचे आहे. तरी येरळवाडी प्रकल्पात पाणी सोडणेबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्याकडे मागणी केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

Ajit Pawar : गुलाबी साडीवाल्या ताईचा गुलाबी प्रश्न; अजित पवारांचं भन्नाट उत्तर, महिलांमध्ये हास्यकल्लोळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Truck Accident : पुणे बंगळुरू हायवेवर भीषण अपघात, तिघे जागीच दगावलेAmbernath Truck Bike Accident : घाई करणं भोवलं, दुचाकी थेट ट्रक खाली, मृत्यू अक्षरश: कट मारून गेलाABP Majha Headlines : 04 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde At Lalbaugcha Raja : एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनाला, बाप्पासाठी काय नेलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
Sadabhau Khot VIDEO : संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे मृत्यूप्रकरण; संपत्ती हडपण्याचा डाव, पाच जणांवर गुन्हा दाखल
शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे मृत्यूप्रकरण; संपत्ती हडपण्याचा डाव, पाच जणांवर गुन्हा दाखल
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
Embed widget