एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्रिपद स्वीकारताना लोक काय म्हणतील? याची भीती होती, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

Devendra Fadnavis, नागपूर : उपमुख्यमंत्रिपद स्वीकारताना लोक काय म्हणतील? याची भीती होती, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुरात बोलताना केलंय.

Devendra Fadnavis, नागपूर : "मी विनंती केली होती की, आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करु आणि मी सरकारच्या बाहेर राहिल. मी त्याच कारणही सांगितलं होतं. मी मुख्यमंत्री झालो असतो तर लोकांना वाटलं असतं की हा सत्तेचा भुकेला आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री व्हायचं म्हणत होता आज मंत्रिमंडळात चालला. अशा प्रकारची टीका मला आवडणार नाही. त्यामुळे मी वरिष्ठांना म्हणालो की, पक्षाचं काम द्या. आपण सरकारमधील लोकांना बाहेरुन मदत करु. मी पक्ष वाढवतो. सुरुवातीला हे सगळं ठरलं होतं. मात्र, त्यानंतर पक्षामध्ये तो निर्णय बदलण्यात आला. आज मला वाटतं वरिष्ठांनी जो निर्णय घेतला तो योग्य घेतला. मोदीजी मला म्हणाले होते की, बाहेरुन सरकार चालवलं तर ते चालतं नाही. जो आतमध्ये आहे तोच सरकार चालवू शकतो. कॅबिनेटमध्ये राहून सरकार चालवता येतं, ते बाहेर राहून होणार नाही. मी त्याच क्षणी हो म्हटलं. मनात ही भावना निश्चित होती की, लोक काय म्हणतील. आपण अनेक वेळा लोकांचा विचार करतो. हा किती सत्तापिपासू आहे, असं लोक म्हणतील असं मला वाटतं होतं" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर झालेल्या पक्षाअंतर्गत घडामोडींबाबत भाष्य केलं. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर देशभरातली कार्यकर्त्यांनी मला मेसेज केले, फोन केले, माझ्याशी बोलले. मी आज हे सांगू शकतो की, मुख्यमंत्री झाल्यानंतर जेवढा मान-सन्मान मिळाला नसता. त्यापेक्षा जास्त सन्मान उपमुख्यमंत्री झाल्यावर मिळाला. आताच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री होईल, असं वाटतं होतं. कारण ते मुख्यमंत्री राहिले होते. मला देखील कल्पना नव्हती की, मी मुख्यमंत्री होईल. परंतु जनतेने निर्णयच दिला. 132 जागा भाजपच्या आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न करणे हे जनतेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवडलं नसतं. त्यावेळी माध्यमांमध्ये काही चाललं, पण एकनाथ शिंदेंनी लगेच सांगितलं होतं की, भाजप हाच मोठा पक्ष आहे. भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. माझी काही हरकत नाही. 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही ठरवलं होतं की, सगळी चर्चा करुन सरकार स्थापन करु. त्यामुळे थोडा वेळ लागला. त्या कालावधीमध्ये कधी शिंदे साहेब नाराज कधी अजितदादा नाराज...अशा बातम्या सुरु झाल्या. मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री व्हावं की नाही. असा एकनाथ शिंदेंसमोर प्रश्न होता. मी त्यांना माझा अनुभव सांगितला. मी त्यांना सांगितलं की, तुम्हाला एक पक्ष चालवायचा आहे. पक्ष चालवायचा असेल अशा परिस्थितीत सत्तेच्या बाहेर राहून चावलणं कठिण जाईल. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आलं पाहिजे. ते त्यांनी मान्य केलं. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर फार हास्य नसतं. त्यामुळे लोकांना वाटू लागलं ते नाराज आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
Embed widget