Devendra Fadnavis & Ajit Pawar: आपण जेवढं मागे जाऊ तेवढा वाद वाढेल, देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात अजितदादांना मेसेज दिला
Devendra Fadnavis & Ajit Pawar: ज्यांनी ज्यांनी माझ्यावर 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय ना, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

Devendra Fadnavis & Ajit Pawar: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचारा केल्याचा गंभीर आरोप करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोणी आम्हाला काम काय केले, हे विचारणार असेल तर त्यांनी एकदा आरसा पाहावा. ते दादा (अजित पवार) बोलत आहेत, हे दादा (चंद्रकांत पाटील) बोलत आहेत. निवडणूक रंगात येत आहे. मात्र, आपण जेवढे मागे जाऊ तेवढे वाढेल, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एकप्रकारे हा वाढ न वाढवण्याचा सूचक संदेश दिला. ते सोमवारी पुण्यातील कात्रज चौकात आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत होते. (Pune Mahangarpalika Election 2026)
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या काळात पुण्याचा विकास झाला, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने पुणे महानगरपालिकेत सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास केला. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी वस्तुस्थिती तपासावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Pune Mahangarpalika Election: अजितदादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांकडून अजित पवारांना प्रत्युत्तर
कालच्या सभेत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी प्रत्युत्तर देताना अजित पवार यांना थेट लक्ष्य केले. अजितदादा म्हणाले की, पिंपरी आणि पुण्यामध्ये विकास झाला नाही, मग अजित दादा अगोदर सत्ता तुमची होती, तेव्हा विकास का केला नाही. अजित पवार अनेक वर्ष सत्तेत असताना आम्हाला प्रश्न विचारतात, पाच वर्षात तुम्ही काय केले? त्यांना अनेक कामांच्या यादी सांगता येतील, अजित दादा जनता खुळी नाही. उड्डाणपूल आणि मेट्रो करायला अजित दादा उशीर का झाला? मेट्रो आम्ही आणली, तुमची नुसती कागदावर राहिली. पुण्यात तुम्ही 2001 पासून 2017 पर्यंत मेट्रो करू शकला नाहीत. तुम्ही आम्हाला विचारता काय केलं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. अजितदादा, दमानं घेऊ नका आणि हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहे हे विसरू नका, असा गर्भित इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.
आणखी वाचा























