देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, महाविकास आघाडीच्या नेत्याची थेट अमित शाहांकडे मागणी
Rohit Pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झेड प्लस सुरक्षा द्या, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
Rohit Pawar on Devendra Fadnavis, पुणे : "आमचे गृहमंत्री धोक्यात आहेत. फडणवीसांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केलीय मी अमित शहांना विनंती करतो की, देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी", असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. ते पुण्यातील राष्ट्रवादीच्या सभेत बोलत होते.
📍#Live आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत पुण्यात खराडी येथून महानिर्धार मेळावा... https://t.co/24UYhg0cVG
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 27, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (दि.27) एका महिलेने हल्ला केला. दरम्यान, सर्व सुरक्षा यंत्रणा भेदून महिलेने कार्यालयावर हल्ला केल्याने विरोधकांनी गृहमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज फडणवीस यांच्यावर उपाहासात्मक टीका केली होती. त्यानंतर रोहित पवारांनीही अमित शाहांकडे फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा द्या, अशी मागणी करत टीका केली आहे.
बापूसाहेब पठारेंसह 10 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पुण्यात शरद पवारांच्या उपस्थित माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह दहा माजी नगरसेवकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटात असलेले आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात बापू पठारेंची उमेदवारी शरद पवार जाहीर करणार आहेत. या सभेत राहित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
उमेदवारी बापू पठारेंना द्यायची की त्यांचा मुलगा सुरेंद्रला द्यायची हे शरद पवार ठरवतील
रोहित पवार म्हणाले, भाजपचे 60 ते 65 , शिंदेंचे 30 आणि गुलाबी गँगचे 11 असे महायुतीचे 120 आमदार निवडून येतील. यापेक्षा जास्त निवडून येणार नाहीत. महाविकास आघाडीचे 180 आमदार निवडून येतील. शरद पवारांना वाढदिवसाची भेट म्हणून येणाऱ्या निवडणूकीत 85 आमदार निवडून आणायचे आहेत. 16 नोव्हेंबरला निवडणूक होऊ शकेल. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी बापू पठारेंना द्यायची की त्यांचा मुलगा सुरेंद्रला द्यायची हे शरद पवार ठरवतील, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या