एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: भाषण सुरु असताना फडणवीस अचानक म्हणाले, 'पवारसाहेब आपल्या पाठिशी'; अकोल्यात नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात सभा घेतली.

अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवार साहेब आपल्या पाठिशी आहेत, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अकोल्यातील भाषणात केले. त्यांचे हे वक्तव्य ऐकून क्षणभरासाठी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केलेले पवार साहेब म्हणजे कोण, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली. परंतु देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ या गोष्टीचा खुलासा करत पवार साहेब म्हणजे अजित पवार, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महायुतीचे अकोल्यातील लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांच्या प्रचारासाठी बुधवारी अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात देशात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता आली पाहिजे, असे म्हटले. विरोधक मोदीजींना पंतप्रधान करण्यास नकार देत असतील तर मग तुम्ही सांगा तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण हवंय? या देशाचा विकास कोण करु शकते?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

मोदींमुळे चीन आणि पाकिस्तान आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही: देवेंद्र फडणवीस

देश तर सोडा पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैश्विक स्तरावर आपली प्रतिमा निर्माण केली आहे. पाकिस्तान आणि चीन हे देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाहीत. असा मजबूत भारत पंतप्रधान मोदी यांनी निर्माण केला आहे. आज चंद्रावर आपलं यान उतरलं आहे, आपण सूर्याला गवसणी घातली आहे. कालपर्यंत प्रगत देशांना जे जमत होतं, ते भारतालाही जमू लागले आहे. इतर देश म्हणत आहेत की, आता भारताशिवाय जगाची कल्पना करता येणे शक्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी भारताला या स्तरावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे आपल्या पंतप्रधान मोदींच्या बाजूने उभे राहायचे आहे, असे फडणवीसांनी म्हटले.

लोकांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतली पाहिजे. आपल्या अनुपला दिल्लीला पाठवा. अनुप दिल्लीत आला की, आम्ही सगळे त्याच्या पाठिशी आहोत. शिंदे साहेब असतील, आमचे पवार साहेब असतील, आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. पवार साहेब म्हणजे कन्फ्युजन नको, पवार साहेब म्हणजे अजितदादा, असे फडणवीस यांनी म्हटले. आमचे महायुतीचे नेते अनुपच्या पाठिशी आहेत, आम्ही अनुपला विकासात मदत करु. मी विश्वासाने सांगतो की, आमच्या संजयभाऊंनी 15 वर्षे विकास केला, पण अनुप हा रेकॉर्ड तोडेल. बापापेक्षा बेटा सवाई निघेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

आणखी वाचा

मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो, जगाला उत्तर द्यावं लागतं : देवेंद्र फडणवीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खाजगी वॉर्डात शिफ्ट करणारSSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरणPravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Embed widget