एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On Jain Community White Line Controversy: मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis On Jain Community White Line Controversy Mumbai Road: मुंबईत पांढऱ्या पट्टीवरुन होणाऱ्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis On Jain Community White Line Controversy Mumbai Road: जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरुन मुंबईत वाद पाहायला मिळत आहे. मनसेसह शिवसेना ठाकरे गटानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल दादरमध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई महानगरपालिकेला रस्त्यावर काढलेली पांढरी पट्टी पुसून टाकण्यास भाग पाडले. सदर प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis On Jain Community White Line)

कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करणं, दोन समाजात तेढ निर्माण करणं, हे योग्य नाही. एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल, तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे. तसेच इतर समाजाने देखील त्यांच्या परंपरेचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांची परंपरा आहे, त्यांनी इतर समाजाचा देखील आदर राखला पाहिजे. आपल्या संस्कृतीत एकमेकांचा आदर करणं हेच महत्वाचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विनाकारण प्रत्येक गोष्टीला वादामध्ये नेऊन त्यामध्ये राजकारण ओतणं यामुळे कधीच फायदा होत नाही, कधीच मतं मिळत नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. अनेकजण चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्यातील प्रत्येक गोष्टीला मी बोललंच पाहिजे, मी प्रतिक्रिया दिली पाहिजे असं नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On Jain Community White Line)

गिरगावमधील पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला- (Girgaon Jain Community White Line Controversy )

घाटकोपर, दादरनंतर पांढऱ्या पट्टीचा वाद मुंबईत वाढत चालला आहे. दादर येथील पांढऱ्या पट्टीच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर आता गिरगावमधील पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला असून गिरगावमधील मनसे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. मनसे आणि आम्ही गिरगांवकर संघटनेच्या कार्यकर्त्यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले.

नेमकं प्रकरण काय? (Jain Community White Line Controversy Mumbai Road)

जैन धर्मगुरू अनवाणी चालत असल्याने उन्हामुळे गरम झालेल्या रस्त्यावरून चालताना त्रास होऊ नये, यासाठी ही पांढरी पट्टी रंगवण्यात आली होती, असा दावा जैन समाजातील काही सदस्यांनी केला आहे. तसेच घाटकोपर पश्चिमेच्या बाजूला रस्त्यावर अनेक ठिकाणी सफेद पट्ट्या मारलेल्या दिसून आले.  मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Jain Community White Line Controversy Mumbai Road: अरे ए....आवाज खाली...जैन मुनी मराठी महिलेवर संतापले; वादाची पांढरी पट्टी, दादरमध्ये काय घडलं?

MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारणार; मनसेचा 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम, BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, दादरमध्ये राडा!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget