'अबु अझमींना जेलमध्ये टाकतो..छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही', देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात हल्लाबोल
आव्हाड म्हणतात की औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते .यावर आव्हाड का बोलत नाहीत ?असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला

Devendra Fadnavis on Abu Azmi suspension: सपा आमदार अबू आझमी यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे .त्यांचं सदस्यत्व रद्द करावं या मागणीसाठी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला .सभागृहात अबू आजमींच्या वक्तव्यावरून प्रचंड गोंधळ झाल्याचे दिसले . अबू अझमींना जेलमध्ये टाकतो .
शिवाजी महाराज असोत की संभाजी महाराज यांच्याबाबत कोणीही काही बोलत असेल तर ते खपवून घेणार नाही .पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का?आहे का हिम्मत ? असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृह दणाणून सोडले .
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
कोणालाही माफ करणार नाही .अबू अझमींना जेलमध्ये टाकतो .कोरटकर तर चिल्लर माणूस आहे .मात्र आव्हाड म्हणतात की औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते .यावर आव्हाड का बोलत नाहीत ?असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला .यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू होता. कोरटकर वगैरे चिल्लर लोक आहेत .जितेंद्र आव्हाड येथे म्हणतात औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज .औरंगजेब किती बलाढ्य होता .महाराज पाच फुटाचे होते . आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध का नाही करत तुम्ही?
पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का ?आहे का हिम्मत ?आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही . 'देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था ..महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभु राजा था .. 'पंडित नेहरूंचा ही धिक्कार झाला पाहिजे . असे म्हणत विधिमंडळ सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला . यानंतर सभागृहातील गोंधळ प्रचंड वाढला होता. सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकुब करण्यात आले
हेही वाचा:
























