Devendra Fadnavis : मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीस कडाडले
Devendra Fadnavis In Mumbai : श्रमिकांनी श्रम करून बनवलेली ही मुंबई आहे. दहा-वीस टक्के लोक चकचकीत इमारतीत राहतात त्यांचीही मुंबई (Mumbai)नाही. बीएमसीमध्ये काही लोकांनी राज्य केलं. त्यांनी फक्त आश्वासन दिली आणि वर्षानुवर्ष तीच आश्वासन द्यायची.
Devendra Fadnavis In Mumbai : श्रमिकांनी श्रम करून बनवलेली ही मुंबई आहे. दहा-वीस टक्के लोक चकचकीत इमारतीत राहतात त्यांचीही मुंबई (Mumbai)नाही. बीएमसीमध्ये काही लोकांनी राज्य केलं. त्यांनी फक्त आश्वासन दिली आणि वर्षानुवर्ष तीच आश्वासन द्यायची. निवडणुका संपल्या की त्यांना विसरून जायचं. 25 25 वर्ष हे बघितलं. पण मागील दीड वर्षात आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही जेवढे करता येईल तेवढं केलं. रक्ता माणसाची माणसं ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. एफएसआय आणि टीडीआर चे व्यवहार करणारे आमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत. आम्ही मुंबईतील मराठी (Mumbai) माणसाला मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. मुंबईत धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
ठाकरेंनी बिल्डर धार्जिणे धोरण त्यांनी महाराष्ट्रात आणले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील मराठी माणूस स्वत:च घर का मिळवू शकत नाही. कोणत्या अडचणी येतात हे पाहून आपण शासन निर्णय घेतले. मात्र, 2019 मध्ये आपलं सरकार गेलं. ज्यांनी वारंवार आम्ही मराठी माणसासाठी आहोत. मराठी माणसासाठी लढतो, अशा प्रकारच्या वल्गना केल्या त्यांच राज्य आल्यानंतर 2019 चा हा शासन निर्णय त्यांनी गुंडाळून बाजूला ठेवला. त्यांनी बिल्डर धार्जिणे धोरण त्यांनी महाराष्ट्रात आणले. सामान्य मराठी माणसाचे स्वप्न त्यांनी गुंडाळून ठेवले.
शासन निर्णय काढला आणि अंमलबजावणी केली
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, आपल्या आशीर्वादाने शिदें साहेबांच्या नेतृत्वात आपण पुन्हा काम सुरु केले. मुंबई, ठाण्यातील गृहनिर्माणाची परिषद दरेकर यांनी घेतली. बिल्डरांच्या जाळ्यातील सामन्यांना घर घेऊन देण्यासाठी काय करता येईल, यासाठी 16 मागण्या माझ्यासमोर ठेवण्यात आल्या. त्या सोळा मागण्या मी पूर्ण केल्या. जीआर काढला. शासन निर्णय काढला आणि अंमलबजावणी देखील सुरु केली. ती अंमलबजावणी झाल्याबद्दल धन्यवाद देवेंद्रजी हा कार्यक्रम घेतलाय, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
परिवर्तन सुरू झाला आहे ते आता दिसत आहे...
फडणवीस म्हणाले, पुढील दहा वर्षांनी माझ्यासमोर बसलेला प्रत्येक माणसाला हक्काचा घर हे त्याचा असेल, अशा करिता मुंबईकरता तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. तुमच्या आशीर्वादाची ताकद ही इतकी जबरदस्त आहे की हे परिवर्तन आम्ही करून दाखवू. अभयदय नगरचा सीएनडीचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथे येण्याआधी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ती फाईल आपण संपूर्ण पूर्ण केली आहे सर्व काम केलं आहे. ती फाईल कॅबिनेट पर्यंत पोहोचवली आहे आणि मला मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्या वतीने तुम्ही घोषणा करा की पुढच्या कॅबिनेटमध्ये अभ्युदय नगरच्या सीएनडीचा विकास करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या