एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: देवेंद्र फडणवीस सर्वात मोठी चूक करतायत, त्यांच्यामुळे मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: गेल्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट भाषेत टीका करण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.

बीड: आगामी लोकसभा निवडणुकीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा द्वेषामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी मी मराठा समाज आणि सत्ता याच्यातील काटा आहे. हा काटा काढावाच लागणार, असा पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. पण मीदेखील तुरुंगात सडायला तयार आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गृहमंत्र्यांना आव्हान दिले. ते रविवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जरांगे यांच्या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे काही प्रतिक्रिया देणार का,हे आता बघावे लागेल.

बीडच्या गेवराई तालुक्यात रविवारी 'मोफत नोकरी महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मनोज जरांगे यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. यावरुन फडणवीसांच्या मनात असलेला मराठ्यांविषयीचा द्वेष दिसून येतो. गोरगरीब मराठ्यांचे काम त्यांना पुढे जाऊन द्यायचे नाही. त्यांच्या पोटात मराठ्यांविषयी किती राग आहे, हेच दिसून येते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एसआयटी चौकशी लावण्यात आली आहे. एसआयटीच्या पथकाकडून माझ्या डॉक्टरांची चौकशी केली जात आहे. माझ्यावर जेसीबीतून फुले उधळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी चूक आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

फडणवीस मोदी साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करतील: मनोज जरांगे पाटील

देवेंद्र फडणवीस यांचे सध्याचे वर्तन म्हणजे ग्रामीण भागातील 'बुडतीचे पाय डोहाकडे' या म्हणीप्रमाणे आहे. फडणवीस मोदी साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. माझ्यावर फुलं टाकणाऱ्या लोकांवर गुन्हे का दाखल केले जात आहेत? राज्य सरकार माझ्यावर इतकं का जळतं? देवेंद्र फडणवीस तुमच्या जळण्याने काही होणार नाही. हे वर्तन गृहमंत्र्यांना शोभत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी आता माझ्यावर सूड उगवायचे ठरवले आहे.मी म्हणजे त्यांना सत्ता आणि मराठा समाज यांच्यात असलेला काटा वाटत आहे. हा काटा काढावा लागणार, हा देवेंद्र फडणवीसांचा पण आहे. पण मीदेखील तुरुंगात सडायला तयार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. गोरगरीब मराठा समाज एकदा पण केला की तो पूर्णच करतो. तुम्हाला तुमचा पण पूर्ण करायचा आहे, आम्ही देखील आमचा पण पूर्ण करू, असा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला.

मनोज जरांगेंवर 5 गुन्हे दाखल

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी राज्य सरकारची भूमिका पूर्णपणे बदलली होती. इतके दिवस राज्यभर फिरून सत्कार स्वीकारणाऱ्या आणि गर्दी जमवणाऱ्या मनोज जरांगे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर बीडमध्ये विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्यावर दाखल करण्यात आलेला हा पाचवा गुन्हा दाखल ठरला होता. 

आणखी वाचा

महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव, मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'

व्हिडीओ

Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
Embed widget