Devendra Fadanvis Power Outfit: देवाभाऊंनी शपथविधीसाठी शिवले खास 4 जॅकेट्स, तीन दशकांपासून फडणवीसांच्या टेलरनं सांगितली कलर चॉईस
5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे, हा ठाम विश्वास असल्याने काही दिवसांपूर्वीपासूनच त्यांच्यासाठी जॅकेट शिवणे सुरू केले होते
CM Oath Ceremony:देशाच्या पॉवरफूल खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीनं कसं दिसावं याची खबरदारी घेणारे अनेक नेते आहेत.आपल्या पांढऱ्याशुभ्र सदऱ्यांना आणि पायजम्यांना इस्त्री करताना स्वतंत्र व्यक्तीच्या नेमणूकीपासून आऊटफीट डिझाईनवर (Power Outfit) बारकाईनं लक्ष दिलं जाऊ लागलंय. आपल्या राहणीमानातूनही आपल्या आत्मविश्वाास आणि व्यक्तिमत्वाची जरब बसावी, आपल्या शैलीची छाप जनसमुदायात पडावी याची विशेष काळजी घेतली जाताना दिसते. महाराष्ट्रात आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपुरात गेले तीन दशक देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कपडे शिवणाऱ्या पिंटू मेहाडीया या टेलरने त्यांच्या शपथविधीसाठी खास चार जॅकेट शिवले असून ते मुंबई फडणवीसांच्या हाती सोपविले आहे. शपथविधीच्या दिवशी फडणवीस मी शिवलेल्या जॅकेटपैकी एक म्हणजे निळ्या रंगाचा जॅकेट घालतील असा विश्वासही पिंटू मेहाडियाने व्यक्त केलाय.
5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे, हा ठाम विश्वास असल्याने काही दिवसांपूर्वीपासूनच त्यांच्यासाठी जॅकेट शिवणे सुरू केले होते आणि नुकतच मुंबईला जाऊन ते जॅकेट त्यांच्या हाती सोपविल्याची माहिती ही मेहाडिया यांनी दिली आहे..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा होईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना फडणवीसांचा पॉवर आऊटफीट काय असणार याकडेही अनेकांचे लक्ष असणार आहे. कोणत्या रंगांचा समावेश ते आज शपथविधीत करतील हे तीन दशकांपासून फडणवीसांचा टेलर म्हणून काम करणाऱ्या पिंटू मेहाडिया यांनी सांगितलंय.
शपथ घेताना देवाभाऊ कोणत्या रंगाचं जॅकेट घालणार?
निळ्या रंगाचे तीन वेगवेगळे शेड्स आणि ग्रे रंगाचा एक शेड असे चार जॅकेट फडणवीसांसाठी शिवले असून देवा भाऊ यांना निळा रंग आवडतो. म्हणून शपथविधीच्या दिवशी तीन निळ्या जॅकेट्स पैकी एक जॅकेट ते घालतील असा विश्वासही मेहाडिया यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या गोविंदा कलेक्शनचे पिंटू मेहाडिया फडणवीस महापौर झाले होते, तेव्हा पासून त्यांचे कपडे शिवतात. आधी फक्त निळ्या रंगाचे जॅकेट घालणारे फडणवीस आता गुलाबी, पिवळा असे सर्वच रंगाचे जॅकेट घालतात.आता त्यांच्याकडे कपडे पसंद करण्यासाठी फारसा वेळ नसल्यामुळे त्यांच्या पसंतीप्रमाणे मीच कापड आणि त्यासाठीचा रंग निवडून त्यांच्यासाठी जॅकेट तयार करतो अशी माहिती ही मेहाडिया यांनी दिली.