Temple Demolition: मंदिर पाडणे हा हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न आहे: प्रवीण तोगडिया
Praveen Togadia Reaction on Temple Demolition: आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी रविवारी सांगितले की, मंदिरे पाडणे हा हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न आहे.
Praveen Togadia Reaction on Temple Demolition: आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी रविवारी सांगितले की, मंदिरे पाडणे हा हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात अतिक्रमण हटवताना मंदिर पाडल्याच्या संदर्भात तोगडिया यांनी हे वक्तव्य केलं आहे. स्थानिक लोकांचा दावा आहे की, हे मंदिर 300 वर्षे जुने होते आणि गर्भगृहात स्थापित केलेल्या देवतांच्या मूर्तींचा विध्वंस होत असताना त्यांचा अनादर करण्यात आला होता.
तोगडिया म्हणाले, हे दुःखद आहे. मंदिर पाडले जाऊ नये. देशात जिथे जिथे ज्यांचे सरकार असेल, तिथे मंदिरे पाडली जाणार नाहीत, हे काँग्रेस आणि भाजप या दोघांचेही मत असले पाहिजे. कारण मंदिर विध्वंस हा हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, प्राचीन मंदिर पाडण्यावरून हा वाद सुरू झाला आहे. याबाबत काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी अजूनही सुरूच आहे.
देशातील धार्मिक स्थळांवर बेकायदेशीरपणे लावलेले लाऊडस्पीकर काढून टाकण्याच्या मोहिमेवर आणि कायदेशीररित्या लावलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज कमी किंवा मर्यादेत ठेवण्याच्या मुद्द्यावर तोगडिया म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे आदेश आणि निर्देशांचे पालन केले पाहिजे. ते म्हणाले की, देशातील सर्व मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवावेत आणि मशिदीत लाऊडस्पीकर ठेवायचा असेल तर त्याचा आवाज परिसराबाहेर ऐकू नये.
महागाईबाबत प्रवीण तोगडिया म्हणाले की, वाढती महागाई हे देशातील सामान्य माणूस आत्महत्या करण्याच्या मार्गावर आल्याचे लक्षण आहे. ते म्हणाले, "केंद्र आणि राज्य सरकारने महागाई रोखण्यासाठी पेट्रोल/डिझेलवरील उत्पादन शुल्क आणि व्हॅट कमी केला पाहिजे." तोगडिया यांनी लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणण्याच्या गरजेवरही भर दिला.
महत्वाच्या बातम्या:
General Manoj Pandey : कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार : मनोज पांडे
Coronavirus : पोटदुखी आणि जुलाबाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका ; कोरोनाबाबत डॉक्टरांचा इशारा
राष्ट्रगीत गाऊन पंतप्रधान मोदींचे मन जिंकणाऱ्या टांझानियाच्या काइली पॉलवर प्राणघातक हल्ला