Congress : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात प्रिया दत्त रिंगणात? विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मोठी खेळी करणार
Maharashtra Assembly Election : महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मुंबईतील वांद्रे पश्चिमची जागा काँग्रेस लढण्याची शक्यता आहे.
मुंबई : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा येत्या 10 दिवसांमध्ये पूर्ण होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांबाबत देखील महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप समोर आलेला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मुंबईतील 6 पैकी 4 जागा जिंकत महायुतीला धक्का दिला होता. मुंबई उत्तर मध्य लोकसा मतदारसंघात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्वल निकम यांना पराभूत केलं होतं. याच मतदारसंघात वांद्रे पश्चिम आणि वांद्रे पूर्व हे दोन मतदारसंघ येतात. यापैकी वांद्रे पश्चिममध्ये काँग्रेसकडून माजी खासदार प्रिया दत्त यांना उमेवारी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या वांद्रे पश्चिमचे विद्यमान आमदार आशिष शेलार आहेत. आशिष शेलार विरुद्ध प्रिया दत्त अशी निवडणूक होणार का हे जागावाटप झाल्यानंत स्पष्ट होईल.
प्रिया दत्त यांना वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत काँग्रेसचा विचार आहे. प्रिया दत्त या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत. प्रिया दत्त यांचा या मतदारसंघात प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं. प्रिया दत्त यांना उमेदवारी जिंकवून ही जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुसरीकडे काँग्रेसला वांद्रे पश्चिम मतदारसंघ दिल्यास वांद्रे पूर्वची जागा शिवसेना ठाकरे गटाला द्यावी लागण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या होत्या. वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून चांगली मतं मिळाली होती. मात्र, भाजपच्या उज्वल निकम यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आघाडी मिळाली होती. उज्वल निकम यांना या मतदारसंघात मिळालेली आघाडी ही फार मोठी नव्हती. उज्वल निकम यांना 72593 मतं मिळाली तर वर्षा गायकवाड यांना 69 हजारांपेक्षा अधिक मितं मिळाली होती. त्यामुळं काँग्रेसच्या या विधानसभा मतदारसंघात यश मिळण्याबाबतच्या आशा वाढलेल्या आहेत. लोकसभेचा कल पाहता आशिष शेलार आणि प्रिया दत्त यांच्यात जोरदार लढत होऊ शकते.
वांद्रे पूर्व जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडावी लागणार?
वांद्रे पूर्व जागेवर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विजयी झाले होते. आता, झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. झिशान सिद्दीकी यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करत विजय मिळला होता. आता राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांना यावेळी मोठी आघाडी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर मविआला ही जागा जिंकण्याची आशा आहे. मात्र, वांद्रे पूर्वची जागा विधानसभेला आपल्या पक्षाला मिळावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत.
इतर बातम्या: