काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर, ईडीने त्यांना 23 जूनला हजर राहण्यास सांगितले
Sonia Gandhi Health: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली.
Sonia Gandhi Health: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना 12 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या श्वसनमार्गामध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले. सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून त्या बऱ्या होत असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी (sonia gandhi) यांना नवीन समन्स जारी केले आहेत. सोनिया गांधी यांना यापूर्वी 8 जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी नवीन तारीख मागितली होती. तपास यंत्रणा आधीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत असून ते सोमवारी ईडीसमोर हजर होतील.
राहुलही सोनिया गांधींसोबत रुग्णालयात थांबले
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ईडीच्या तपास अधिकार्यांना पत्र (ED Investigation Officer) लिहून चौकशी पुढे ढकलण्याची विनंती (Request) केली होती की, त्यांना त्यांची आजारी आई सोनिया गांधी यांच्यासोबत राहायचे आहे. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नॅशनल हेराल्ड प्रकरणाची (National Herald Case) चौकशी 18 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची राहुल गांधी यांची विनंती मान्य केली. हा दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधी आज रात्र आई सोनिया गांधी यांच्यासोबत दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (Ganga Ram Hospital) थांबतील.
इतर महत्वाच्या बातम्या:
Bike Riding Tips For Rain: पावसात दुचाकी चालवताय? अपघात टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Agnipath Scheme : पंतप्रधान मोदींना 'माफीवीर' व्हावे लागेल, अग्निपथ योजनेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल