एक्स्प्लोर

Bike Riding Tips For Rain: पावसात दुचाकी चालवताय? अपघात टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Bike Riding Tips For Rain: भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Bike Riding Tips For Rain: भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत वाहन चालवणे खूप कठीण होऊन जाते. मुसळधार पावसाचा सामना करण्याबरोबरच वाहनचालकांना जोरदार वाऱ्याचाही सामना करावा लागतो. अशा हवामानात गाडी चालवताना खबरदारी घेतली पाहिजे. पावसाळ्यात रस्ते अपघातात वाढ होते, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी. पावसाळ्यात दुचाकी आणि स्कूटर चालवणाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. रस्ते निसरडे झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढते. कधी कधी छोट्या चुकांमुळेही मोठा अपघात होतो. पावसाळ्यात रस्त्यावरील तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. 

वेग कमी ठेवा

पावसाळ्यात वेगाने गाडी चालवू नका. कारण पावसात रस्त्यावरील ट्रॅक्शन कमी होते, त्यामुळे तुमचे वाहनावरील नियंत्रणही कमी होते. मग ती बाईक असो वा स्कूटर. इतकेच नाही तर गाडी चालवताना अचानक ब्रेक लावल्याने ब्रेकही प्रभावीपणे लागत नाही. त्यामुळे पावसाळ्यात तुमच्या दुचाकीचा वेग ताशी 40 किलोमीटरपेक्षा कमी ठेवा.

रस्त्यावर पाणी भरले असेल तर थांबा

पावसाळ्यात ठिकठिकाणी रस्ते जलमय होतात. त्यामुळे अनेकवेळा रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले दिसत नाहीत. हा त्रास रात्रीच्या वेळी जास्त होतो. त्यामुळे जिथे पाणी भरले आहे, तिथे अजिबात गाडी चालवू नका.

हेल्मेट घालणे आवश्यक 

तुम्ही कुठे जवळ ही जात असाल तरीही हेल्मेटशिवाय बाईक किंवा स्कूटर कधीही चालवू नका. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात हेल्मेट घाला. पावसात हेल्मेटच्या व्हिझरमुळे पावसाचे थेंब डोळ्यांवर पडत नाहीत, त्यामुळे दुचाकी चालवणे सोपे जाते. तसेच हेल्मेट तुम्हाला सुरक्षित ठेवते.

गाडी चालवताना अंतर ठेवा 

पावसाळ्यात समोरच्या वाहनापासून नेहमी योग्य अंतर ठेवा. पावसात रस्त्यावर ट्रॅक्शन कमी होते, त्यामुळे योग्य वेळी ब्रेक लावला जात नाही. याशिवाय वाहनाचा हेडलाईट नेहमी चालू ठेवा.

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Navneet Rana : नवनीत राणांच्या उमेदवारीला शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ, बच्चू कडूंचा विरोधBachchu Kadu on Navneet Rana : नवणीत राणा यांना उमेदवारी, भाजपची लाचारी, बच्चू कडूंची टीकाTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 March 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  04 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Sanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?
शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? यादीत कुणाकुणाची नावं?
'पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जातेय'; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप
'पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जातेय'; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप
Arvind Kejriwal on ED : 'आप'ला ठेचणे, खंडणी रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू; अरविंद फार्माने 55 कोटींचे निवडणूक रोखे भाजपला दिले; केजरीवालांचा गौप्यस्फोट
'आप'ला ठेचणे, खंडणी रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू; अरविंद केजरीवालांचा ईडीवर गंभीर आरोप
RR Vs DC Dream11 prediction: जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
Embed widget