एक्स्प्लोर

Balu Dhanorkar Passes Away : शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश, संघर्षातून विजय; बाळू धानोरकरांच्या जाण्याने काँग्रेस नेत्यांना शोक अनावर

Balu Dhanorkar Passes Away : खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने धक्का बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त होत आहे. ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

Balu Dhanorkar Passes Away : चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू  धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पित्ताशय (Gallbladder) आणि स्वादुपिंडामध्ये (Pancreas) इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखरे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने धक्का बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त होत आहे. ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

दरम्यान बाळू धानोरकर यांचं पार्थिव सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने चंद्रपुरात आणण्यात येईल. तर उद्या त्यांच्यावर वाजता वरोरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली.

लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते.

बाळू धानोरकर यांच्या निधनावर नेत्यांच्या प्रतिक्रिया  

बाळासाहेब थोरात
बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्य माणूस ते आमदार आणि खासदार होण्याचा प्रवास प्रेरणादायी होता. ते आमदार असताना माझा त्यांच्याशी परिचय झाला. त्यांच्या मतदारसंघात मोठी लोकप्रियता मिळवली होती, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.

पृथ्वीराज चव्हाण
सकाळीच बाळू धानोरकर यांच्या निधनाची बातमी आली आणि धक्का बसला. त्यांचा फार वय नव्हतं. हा काँग्रेस आणि महाराष्ट्राकरता मोठा धक्का आहे. 2019 च्या अत्यंत संघर्षमय आणि अटीतटीच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दु:खाची छाया पसरली आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करुन त्यांना दु:ख पचवण्याची ताकद देवो, अशी प्रार्थना करतो, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला.

अशोक चव्हाण 
काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं आणि दोन दिवसांत त्यांच्या निधनाचे वृत्त येणं, हे सारं अकल्पनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. राजकीय कारकिर्द बहरास येत असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं आहे. खा. बाळूभाऊ धानोरकर आमचे एक सक्षम, उर्जावान सहकारी होते, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व सतत कार्यमग्न असे लोकप्रतिनिधी होते. जमिनीशी नाळ जुळलेले, दांडगा जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या चेहर्‍यावर सदोदित दिसणारे हास्य, आपुलकीने बोलणं नेहमी स्मरणात राहिल. खा. बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. या दुःखद क्षणी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या.

अजित पवार
"चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. चंद्रपूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व आपण गमावले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची, महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

हंसराज अहिर
बाळू धानोरकर यांच्या निधनाच्या बातमीने अतिशय दुख झालं. धाडसी आणि साहसी नेता म्हणून मी त्याचा उल्लेख करतो. त्यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. उमेदीच्या काळात त्यांना जगाचा निरोप घेतला. या एकाच आठवड्यात त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झाला, आज बाळू धानोरकर यांचं निधन झालं. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना साहस आणि धैर्य देवो ही प्रार्थना, असं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले.

किशोर जोरगेवार
अतिशय दु:खद घटना आहे. धडाडीचा, हिंमतवान लोकप्रतिनिधी म्हणून ओळख होती. मोठमोठे निर्णय सहजपणे करत होते. त्यांच्या कुटुंबावर मोठं दु:ख कोसळलं आहे. धानोरकर यांच्या आत्म्यास शांती मिळो, अशी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. 

सुनील केदार
अत्यंत दुःखदायक घटना आहे. काँग्रेसचे नुकसान झालं आहे. बाळू धानोरकर म्हणजे बहुजन समाजाला घेऊन जाणारं नेतृत्व होते. महाराष्ट्रात मोदी लाटेला थांबवणारा एकमेव नेता म्हणजे बाळू धानोरकर. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी आपला नेतृत्व उभे केला होता. खूप कमी वयात लोकप्रिय झाले होते. 15 दिवसापूर्वी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला भेटायला गेलो होतो. त्यावेळी गप्पा मारल्या होत्या. पाहून वाटले नव्हते की ते आजारी आहे, अशी प्रतिक्रिया सुनील केदार यांनी दिली.

संबंधित बातमी

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Thane Crime: धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Surendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावाABP Majha Headlines : 08 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.00 AM : 29 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Thane Crime: धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
Embed widget