मोठी बातमी : शिंदेंचा काँग्रेसला मोठा दणका! आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश, रामटेकमधून उमेदवारी
MLA Raju Parwe in Shiv Sena Shinde Group : काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुंबई : काँग्रेस (Congress) आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे यांनी शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताच पारवेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याचं बोललं जात आहे. राजू पारवे लोकसभा निवडणुकीसाठी रामटेकमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार आहेत, असा दावा राजू पारवे यांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश
उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , कृपाल तुमाने आणि आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत शिंदे गटात छोटेखानी पक्षप्रवेश झाला आहे', अशी माहिती राजू पारवे यांनी एबीपी माझाला दिली आहे. राजू पारवे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार. त्यांच्या नेतृत्वात आता मी काम करणार असल्याचं सांगितलं आहे.
राजू पारवे धनुष्यबाण चिन्हांवर निवडणूक लढणार?
राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून ते धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटात प्रवेश करताच राजू पारवेंना लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीतमध्ये रामटेक मतदारसंघ शिवसेनेला मिळणार आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी राजू पारवेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
रामटेक मतदारसंघावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच?
रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने हे सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. रामटेक मतदारसंघावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. भाजपला रामटेकची जागा हवी आहे, पण अद्याप निर्णय झालेला नाही, असं सांगितलं जात असताना आता शिवसेना शिंदे गटाकडून रामटकेची उमेदवारी मिळाल्याचा दावा राजू पारवे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :