(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress Expels Kuldeep Bishnoi: काँग्रेसने कुलदीप बिश्नोई यांची सर्व पदांवरून केली हकालपट्टी, राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनंतर मोठी कारवाई
Rajya Sabha Cross Voting: हरियाणा काँग्रेसने (Haryana Congress) आमदार कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Rajya Sabha Cross Voting: हरियाणा काँग्रेसने (Haryana Congress) आमदार कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election Result 2022) क्रॉस व्होटिंगबाबत पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने बिश्नोई यांची पक्षाच्या सर्व विद्यमान पदांवरून हकालपट्टी केली आहे. पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी बिश्नोई यांना काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यासह पक्षाच्या जबाबदाऱ्यांवरून तत्काळ प्रभावाने मुक्त केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेसकडून हरियाणा विधानसभा अध्यक्षांनाही शिफारस केली जाऊ शकते. दुसरीकडे हरियाणातून राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाल्यानंतर बिश्नोई यांनी ट्वीट केले आहे की, 'सापाचा फणा चिरडण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे, सापांच्या भीतीने जंगल सोडू नका. गुड मॉर्निंग.' त्यांनी एका ट्विटर युजरचे ट्विटही रिट्विट केले, ज्यात म्हटले आहे की, 'योग्य वेळी घेतलेला निर्णय एखाद्या व्यक्तीला इतरांपासून वेगळे करतो.'
राज्यसभा निवडणुकीत माकन यांच्या पराभवानंतर हरियाणा प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय सिंह यादव यांनीही एक ट्वीट केले आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा आणि त्यांचे खासदार पुत्र दीपेंद्र हुडा यांना लक्ष्य केले आहे. ते ट्वीट करत म्हणाले आहे की, 'जेव्हा पक्ष कोणत्याही संघर्षाशिवाय मोठ्या नेत्यांच्या मुलांना काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बनवतो, त्यांना राज्यसभेवर पाठवतो, तेव्हा ते पक्षाची विचारधारा विसरून केवळ वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण करतात. ही बाब पक्षाच्या हायकमांडला समजून घ्यावी लागेल.’ नंतर त्यांनी स्पष्ट केले की, ‘माझ्या या ट्विटवर काही लोक स्वार्थापोटी असे म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत की, मी दीपेंद्र हुड्डा यांच्याबद्दल ही टिप्पणी केली आहे. हे चुकीचे आहे. कारण दीपेंद्र हुडा हे काँग्रेसचे समर्पित नेते आहेत आणि ते तीनदा लोकसभेवर निवडून आले आहेत आणि ते पक्षांतर करणारे नाहीत.