एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले

Devendra Fadnavis: मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई कनेक्टींग लिंक विषय समोर आला, एवढे खोटारडे लोक पैदा झाले आहेत, 1 हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील

मुंबई : राज्यात गेल्या 5 दिवसांत मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पुणे-मुंबई वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला होता. त्यातच, दोन दिवसांपूर्वी मिसिंग लिंकवरदेखील (Missing Link) भूस्खलन झाल्याने हा मार्ग देखील जवळपास 20 तास प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यावरुन, मोठ्या प्रमाणात सरकारवर टीका करण्यात आली. 7 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या पुलात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मिसिंग लिंकच्या टीकेवरुन होत असलेल्या ट्रोलिंगला उत्तर दिलंय. तसेच, नाशिकच्या ढगफुटीवरुनही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टोला लगावला. 

मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई कनेक्टींग लिंक विषय समोर आला, एवढे खोटारडे लोक पैदा झाले आहेत, 1 हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील, असे म्हणत मिसिंग लिंक प्रकरणावरुन होणाऱ्या टीकेला फडणवीसांनी विधानसभा सभागृहात उत्तर दिलं. जयंतराव तुम्ही हसू नका, ⁠महायुतीत हिंमत होती म्हणुन कनेक्टिंग लिंक बांधली. ⁠कोकण रेल्वेही तशीच सुरु केली, ⁠जर ती सुरु केली नसती तर असंच राहिलं असतं. मागच्या सरकारच्या मुख्यमंत्र्‍यांनी मिसिंग लिंक करता येत नाही म्हणून 2 पाने लिहून 14 कारणे दिले होती, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात दिली. 

कनेक्टिंग लिंक ही फक्त लिंक नाही तर इंजिनिअरिंग मार्बल तयार झालं आहे, भारताताला सर्वात उंच पुल आणि जगातला सर्वात मोठा बोगदा आपण तयार केला. त्यामुळे सर्व घाट सेक्शन संपला, ⁠सर्व अपघात संपले. येथे पावसामुळे दरडीचा ⁠मलबा खाली आल्याने कमान पडली, यास कुठेही क्रॅक गेला नाही. मात्र, विरोधकांनी असं दाखवायला सुरुवात केली की सात हजार कोटी पाण्यात गेले. पण, 18 तासात वाहतुकीसाठी रस्ता सुरू झाला, तेही ⁠नाकावर टिच्चून असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांनी डिवचले.  

पैसे घेऊन सोशल मीडियावर शिव्या देतात

देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, चालेल त्याची सवय आहे, मी शिव्याप्रुफ आहे.⁠ जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी शिव्या देणारे दिसणार नाहीत मात्र ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं नाव असेल, असे म्हणत फडणवीसांनी ट्रोलर्संना सुनावले. पैसे घेऊन सोशल मीडियावर शिव्या देतात, त्यांनाही सांगू इच्छितो, माझी बदनामी करा चालेल, पण महाराष्ट्र बदनाम कराल तर कोणालाही सोडणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्रोलर्संना जोरदार ठणकावले आहे. तसेच, काही लोक काय खावून येतात हे माहीत नाहीस, ⁠सभागृहात हा विषय येईल, आमचे आंदोलन मोठे होईल म्हणून मुख्यमंत्र्‍यांनी नाशिकचा पाऊस सांगितल्याचं म्हणतात, पण आज नाशिकला मोठा पाऊस सुरू आहे, असे म्हणत फडणवीसांनी नाव न घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही लक्ष्य केलं. 

वसई-विरारची परिस्थिती बिकट

वसई विरारची परिस्थिती बिकट आहे, 72 तासांत 772 मिमी पावसाची नोंद झाली आहे, येथील मोबाईल नेटवर्क गेले आहे. मोबाईल कंपनींसोबत चर्चा झाली आहे, इलेक्ट्रिसिटी डॅमेज झाली आहे, ते काम सुरु केले आहे. कोकण क्षेत्रातील प्रभावित जिल्ह्यात तातडीचा निधी दिला आहे, काही ठिकाणी जेवण देण्यापासून काम करावे लागणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात दिली.  जेन पोर्टलचा वापर केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. विनाकारण फुगवलेले टेंडर स्वीकारायचे नाहीत हा निर्णय घेतला आहे. काही निविदा होत्या, त्यांचा विचार करून 1 हजार 032 कोटी रुपयांच्या निविदा रद्द केल्या आहेत, असेही त्यानी सांगितले. 

हेही वाचा

शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
BJP : विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget