एक्स्प्लोर

सरन्यायाधीश म्हणाले, ईडीचा राजकीय वापर कसा होतो हे महाराष्ट्रात बघितलं; संजय राऊतांनी 'नरकातला स्वर्ग'च पाठवलं

शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावरही पत्राचाळ घोटाळ्याचे आरोप करत ईडीने गुन्हा दाखल केला होता.

मुंबई : देशात आणि महाराष्ट्रात होत असलेल्या ईडीच्या (ED) कारवाईवरुन विरोधक नेहमीच आक्रमक होताना दिसून येतात. कारण, ईडीची कारवाई केवळ विरोधी पक्षांतील नेत्यांवर, आमदार, खासदारांवर आणि उद्योजकांवर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. अनेकदा सोशल मीडियातून देखील ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप सरकारच्या आदेशानेच ईडी काम करत असल्याचे मिम्स आणि जोक्स व्हायरल झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे, ईडीसारख्या संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातच, सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan gavai) यांनी देखील ईडीसंदर्भात धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ईडीचा राजकीय वापर कसा होतो हे महाराष्ट्रात बघितलं, तुमचं राजकारण निवडणुकीत करा अशा शब्दात गवई यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्यातच, आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरन्यायाधीशांना नरकातील स्वर्ग हे पुस्तक पाठवले आहे. 

शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावरही पत्राचाळ घोटाळ्याचे आरोप करत ईडीने गुन्हा दाखल केला होता. 100 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, राऊत यांना जामीन देताना न्यायालयाने ईडीच्या वकिलांना चांगलंच झापलं होतं. आपल्या 100 दिवसांच्या तुरुंगातील अनुभवावर आधारित संजय राऊत यांनी पुस्तक लिहिलं आहे. आपल्या या पुस्तकाची प्रत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांना पाठवली आहे, विशेषत: बड्या भाजप नेत्यांनाही त्यांनी हे पुस्तक वाचण्यासाठी भेट दिलं आहे. आता, सरन्यायाधीशांनी ईडीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी थेट सरन्यायाधीशांना त्यांच्या पुस्तकाची प्रत पाठवली आहे.  

संजय राऊतांचे ट्विट 

''भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना नरकातला स्वर्ग पुस्तकाची प्रत पाठवली. न्या. गवई यांनी ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. महाराष्ट्रातील घटनांचा संदर्भ न्या.गवई यांनी दिला. ईडीचे अघोरी उद्योग कसे असतात तेच नरकातला स्वर्गमध्ये मी सांगितले आहे,'' असे म्हणत संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले.  

ईडीबद्दल काय म्हणाले होते सरन्यायाधीश

म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण घोटाळ्यातील आरोपी असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेली अपील सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यावेळी सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने म्हटले की, राजकीय लढाया न्यायालयाबाहेर लढल्या पाहिजेत. अशा लढाया लढण्यासाठी ईडीचा वापर का केला जातो, असा प्रश्नही त्यांनी विचारला. मतदारांमध्ये राजकीय लढाई लढू द्या. त्यासाठी तुमचा वापर का केला जात आहे? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली. त्यानंतर, संजय राऊत यांनी हे पुस्तक सरन्यायाधीशांना पाठवले. 

हेही वाचा

 ईडीचा राजकीय वापर कसा होतो हे महाराष्ट्रात बघितलं, तुमचं राजकारण निवडणुकीत करा, सुप्रीम कोर्टाने ED ला झाडलं

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टेलिप्रॉम्प्टर समोर केलेलं भाषण हे महिलांसाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी, पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर प्रहार
टेलिप्रॉम्प्टर समोर केलेलं भाषण हे महिलांसाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी, पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर प्रहार
Narendra Modi : 30 मिनिटांच्या भाषणात 60 वेळा काँग्रेसचं नाव, महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
30 मिनिटांच्या भाषणात 60 वेळा काँग्रेसचं नाव, महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
Narendra Modi : काँग्रेसने महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार; नरेंद्र मोदींची टीका
ज्यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला त्यांना परिणाम भोगावे लागतील, त्यांनी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला; नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget